सार
टेक दिग्गज कंपनी अॅप्पलने भारतासह जगभरातील 1 देशातील युजर्सला Mercenary Spyware चा धोका असल्याचे म्हटले आहे. याच्या माध्यमातून काही निवडक युजर्सला इमेल पाठवून टार्गेट केले जात आहे.
Apple Alert : अॅप्पल कंपनीने भारतासह जगभरातील 91 देशातील युजर्सला स्पायवेअर हल्ल्यासंदर्भात एक सतर्कतेचा इशारा दिला आहे. अॅप्पलने म्हटले आहे की, Mercenary Spyware Attack चे तुम्ही शिकार होऊ शकता. खरंतर, याचा युजर्सच्या प्रायव्हेसीला धोका निर्माण होऊ शकतो. या स्पायवेअरचा वापर करून काही निवडक युजर्सला टार्गेट केले जात आहे. कंपनीने इमेलच्या माध्यमातून मर्सनरी स्पायवेअरसंदर्भात माहिती दिली आहे.
मर्सनरी स्पायवेअर नक्की काय आहे?
- रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार अॅप्पल कंपनीने आपल्या इमेलमध्ये म्हटलेय, मर्सनरी स्पायवेअर आयफोन युजर्ससाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे आयफोन रिमोटली कंप्रोमाइज केला जाऊ शकतो.
- इमेलध्ये असेही म्हटलेय की, मर्सनरी स्पायवेअरचा हल्ला सामान्य साबयर हल्ले किंवा काही गोष्टी आणि अन्य मालवेअर हल्ल्याच्या तुलनेत फार आधुनिक आहे, जो आजवर कधीच पाहिला नव्हता.
- मर्सनरी स्पायवेअर अटॅक्सर फार कमी संख्येने काही खास नागरिकांना आणि त्यांच्या डिवाइसला टार्गेट करतात. यासाठी अधिक संसाधनांचा वापर करतात. या स्पायवेअर अटॅक्सचा खर्च लाखो डॉलर्स असू शकतो. त्यांचा शोध घेणे अथवा त्यावर नियंत्रण मिळणे कठीण असते. (Apple kadun iphone usersla warning)
अॅप्पलकडून सातत्याने सतर्कतेचा इशारा
अॅप्पलकडून वर्ष 2021 पासून ते आतापर्यंत काही वेळेस अशा प्रकारच्या हल्ल्याबद्दल युजर्सला सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अॅप्पलने आतापर्यंत 150 हून अधिक देशातील युदर्जसला मालवेअर हल्ल्याबद्दल आधीच इशारा दिला होता.
ऑक्टोंबर 2023 मध्ये भारतातील काही खासदारांनी सोशल मीडियावर अॅप्पलने जारी केलेल्या इमेलचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले होते. यामध्ये म्हटले होते की, अॅप्पलचे असे मानणे आहे तुम्हाला स्टेट स्पॉन्सर (सरकार) हल्ल्याद्वारे टार्गेट केले जात आहे. जो तुमच्या अॅप्पल आयडीसंबंधित (Apple ID) आयफोनला रिमोटली कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात ज्यावेळी सरकारने कंपनीकडे उत्तर मागितले असता त्यांना इमेलमध्ये ज्या हल्ल्याचा धोका सांगण्यात आला होता त्यासाठी कोणत्याही स्पेसिफिक स्टेट स्पॉन्सर अटॅकर्स (Specific State Sponsored Attackers) जबाबदार नाही असे म्हटले होते.
आणखी वाचा :
पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार आहात? या गोष्टींची घ्या काळजी