टाटा कंपनीच्या सर्वात सुरक्षित ५ गाड्या कोणत्या आहेत, माहिती घ्या जाणून
टाटा कंपनीच्या गाड्या सुरक्षिततेसाठी ओळखल्या जातात आणि अनेक मॉडेल्सना ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. या लेखात टाटा पंच, नेक्सॉन, अल्ट्रॉझ, हॅरियर आणि सफारी यांसारख्या गाड्यांच्या सेफ्टी फीचर्स आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चरबद्दल माहिती दिली आहे.

टाटा कंपनीच्या सर्वात सुरक्षित ५ गाड्या कोणत्या आहेत, माहिती घ्या जाणून
टाटा कंपनीच्या गाड्या सुरक्षित आहेत. या कंपनीच्या सर्वच गाड्या या रेटिंगमध्ये टॉपवर असल्याचं दिसून आलं आहे. आपण याच कंपनीच्या गाड्यांबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
Tata Punch
टाटा कंपनीची पंच हि गाडी सर्वात सुरक्षित मानली जाते. या गाडीमध्ये कंपनीकडून ५ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. गाडीचं मजबूत बॉडी स्ट्रक्चर असून ड्युअल एअरबॅग्स त्यामध्ये देण्यात आल्या आहेत. कमी जागेत हि गाडी पार्किंग करता येते.
Tata Nexon
टाटा Nexon हि गाडी भारतातली पहिली ५ स्टार क्रॅश टेस्ट कार म्हणून ओळखली जाते. या गाडीमध्ये ६ एअरबॅग पर्याय देण्यात आले असून फॅमिलीसाठी हि गाडी सर्वात सुरक्षित मानली जाते.
Tata Altroz
प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार म्हणून अल्ट्रॉज गाडीला ओळखलं जात. ALFA आर्किटेक्चरवर बनलेली हि सॉलिड बिल्ड क्व्यालिटीमधली गाडी प्रचंड लोकप्रिय आहे.
Tata Harrier
टाटा हॅरियर हि गाडी OMEGARC प्लॅटफॉर्मवर आधारित असून Land Rover D8 बेसवर खासकरून काम करते. गाडीमध्ये ६ एअरबॅग्स असून गाडीची बॉडी मजबूत आहे. रिअल सेफ्टीमध्ये गाडीचा अनुभव बेस्ट आहे.
Tata Safari
टाटा सफारी हि गाडी भारी आणि सेफ्टी फीचर्सने पुरेपूर असणारी आहे. या गाडीमध्ये एक पुढारी बसल्यासारखा फील येतो. सोबतच या गाडीत आपल्याला हाय प्रोटेक्शन मिळत असून फीचर्स चांगले मिळतात.

