तुमची मुलं सातत्याने मोबाइलचा वापर करतात? होऊ शकतो हा आजार

| Published : Apr 10 2024, 09:08 AM IST / Updated: Apr 10 2024, 03:26 PM IST

use mobile while eating
तुमची मुलं सातत्याने मोबाइलचा वापर करतात? होऊ शकतो हा आजार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

आजकाल लहान मुलांच्या हातातही मोबाइल दिसून येतो. खरंतर, लहान वयात मुलांच्या हातात मोबाइल देणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असते. पण तुमचे मुलंही सातत्याने मोबाइलवर असते का?

Parenting Tips : आजकाल बहतांश पालक आपले मुलं रडू लागल्यानंतर अथवा घरातील कामे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल देतात. यामुळे रडणारे मुलं अगदी शांत होते. खरंतर, मुलांना रडण्यापासून शांत करण्यासाठी मोबाइल देणे एक सोपा उपाय आहे. पण याचा नकारात्मक परिणाम मुलांवर होऊ शकतो हे पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

काही दिवसांपूर्वी असे समोर आले आहे की, जी मुलं सातत्याने स्क्रिन पाहतात त्यांच्यामध्ये ऑटिज्मचा (Autism) आजार उद्भवू शकतो. खरंतर, ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर एक डेव्हलपमेंट डिसअ‍ॅबिलीटी आहे. यामध्ये मुल एकमेकांसोबत मिक्स होणे, संवाद साधणे अथवा एखाद्या कामामध्ये सक्षमपणे निर्णय घेण्यास घाबरतो. ऑटिज्म आजाराचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव पडला जातो.

मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासाकडे लक्ष देण्याची गरज
बालपणापासून मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासाला सुरूवात होते. यावेळी मुलं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहून शिकत असतात. यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवला पाहिजे. जेणेकरुन मुलं मोबाइलच्या वापरापासून दूर राहिल. याशिवाय पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासाकडे लक्ष द्यावे. 

काही वैद्यकीय अभ्यासातून समोर आलेय की, जी लहान मुलं टीव्ही, व्हिडीओ गेम, आयपॅड अथवा कंप्युटरसह अन्य स्क्रिनच्या समोर सातत्याने बसून असतात त्यांच्यामध्ये ऑटिज्मसंबंधित लक्षणे दिसून येऊ शकतात.(Autism manje kay)

बदललेली पिढी आणि लाइफस्टाइल 
आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत सध्याची पिढी फार बदललेली आहे. दिवसागणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या नव्या बदलाचा प्रत्येकाच्या आयुष्यावर वेगवेगळ्या रूपात प्रभाव पडला जातो. अशातच सध्याची पिढी टेक्नोसेविक (Technosevik) झाली आहे. यामुळेच लहानांपासून ते वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातात सातत्याने मोबाइल दिसून येतो.

काही अभ्यासातून असे समोर आलेय की, सातत्याने स्क्रिन पाहिल्याने व्यक्तीमध्ये असमान्य व्यवहार, मानसिक ताण आणि संवाद साधण्यासह अन्य काही गोष्टी करण्यास समस्यांचा सामना करतो. 

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

पार्टनरसोबत मिळून मद्यपान करता? अभ्यासातून झालाय हा खुलासा

सुटलेले पोट कमी करायचेय? दररोज 10 मिनिटे करा हे काम

महिलांनो काम आणि कौटुंबिक जीवनातील संतुलन राखण्यासाठी नक्की वाचा...