मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू, रिपोर्टमधून खुलासा

| Published : Mar 18 2024, 01:58 PM IST

Mumbai Zoo

सार

मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. खरंतर, केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या प्राधिकरणाने पशूंच्या मृत्यूसंदर्भातील रिपोर्ट जारी केला आहे.

Mumbai Zoo : मुंबईतील राणीबाग म्हणून ओखळ असणाऱ्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात वर्ष 2022-23 दरम्यान 40 पेक्षा अधिक पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने जारी केली आहे.

पशूंच्या मृत्यूबद्दल चौकशी करा
वॉचडॉग फाउंडेशनने राणीबागेतील पशूंच्या मृत्यूसंदर्भात मागणी केली आहे. अशातच प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाने दावा केलाय की, पशूंचा मृत्यू त्यांच्या वयानुसार नैसर्गिक रुपात झाली आहे. पशूंच्या मृत्यूदरात वाढ झालेली नाही. वार्षिक रिपोर्ट्सनुसार, 2022-23 दरम्यान, भायखळातील प्राणी संग्रहालयातील वेगवेगळ्या प्राजतींचे 40 पशू आणि पक्षांचा मृत्यू झाले आहेत.

वॉचडॉग फाउंडेशनने (Watchdog Foundation) महापालिका आयुक्त इकबाल सिंह चलह (Iqbal Singh Chahal) यांना या प्रकरणात दखल घेण्यास तपास करण्याची मागणी केली आहे. याशिवाय एनजीओचे पिमेंटा गॉडफ्रे आणि निकोलस अल्मेडा यांनी देखील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे.

फाउंडेशनने आरोप लावला की, मृत्यू पशूंमध्ये विलुप्त होणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे. या रिपोर्ट्सनुसार काही पशूंचा मृत्यू कार्डियक अरेस्ट, सेस्पिरेटरी फेल्युअर, मल्टीपल ऑर्गन फेल्योअरच्या कारणास्तव झाला आहे. याच पशूंच्या मृत्यूबाबत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत पशूंमध्ये पट्टेदार हरिण, खेचर, पोपट, कासव यांचा समावेश आहे.

दरम्यान जीजामाता भोसले प्राणी संग्रहालयाचे निर्देशक डॉ. संजय त्रिपाठी यांनी म्हटले की, प्राणी संग्रहालयात पशूंचा मृत्यू होणे सामान्य बाब आहे. प्राणी संग्रहालयात 400 हून अधिक पशू-पक्षी आहेत.

आणखी वाचा : 

Mumbai Railway Stations Name : मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांना मिळणार ही नवी नावे, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेरील पाटी बदलली, 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' लावले नाव (VIDEO)

मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन, महिलांसाठीही विशेष Buses ला दाखवला हिरवा झेंडा