सार

शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असल्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतला गेला. अशातच मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या दालनाबाहेरील पाटीवर आपल्या आईचेही नाव लिहिले आहे.

Maharashtra : शासकीय कागदपत्रांवर आता वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मंत्रालयाच्या (Mantralaya) सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटी आज (13 मार्च) बदलली गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंत्रालयातील दालनाबाहेर 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' अशी पाटी लावली आहे.

राज्यातील नागरिकांना आता शासकीय कागदपत्रांसवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःपासून करायची असे ठरविले होते.

माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पासूनच सुरु केली आहे.

आणखी वाचा : 

Maharashtra : शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाशिममध्ये अनावरण (See Photos)