मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन, महिलांसाठीही विशेष Buses ला दाखवला हिरवा झेंडा

| Published : Mar 11 2024, 11:21 AM IST / Updated: Mar 11 2024, 12:29 PM IST

Mumbai Costal Road Project
मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन, महिलांसाठीही विशेष Buses ला दाखवला हिरवा झेंडा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बहुप्रतिक्षित मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन केले जाणार आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

Mumbai Costal Road Inauguration : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या हस्ते आज (11 मार्च) मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.या कोस्टल रोडला ‘धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड’ असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. यामुळे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात आजपासून होणार आहे. कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा वरळी (Worli) ते मरीन ड्राइव्ह (Marin Drive) पर्यंत असणार आहे.

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यात 10.58 किलोमीटर लांब पूल तयार केला जात आहे. याशिवाय 2.4 किलोमीटर दूर पर्यंत सागरी बोगदा तयार करण्यात आला आहे. एकूण 13,898 कोटी रुपयांच्या प्रकल्पामध्ये आतापर्यंत 9383 कोटी रुपयांचे काम करण्यात आले आहे.

देशातील पहिला सागरी बोगदा
देशातील पहिलाच सागरी बोगदा तयार करण्यात आला आहे. बोगदा 40 फूट रूंद आहे. कोस्टल रोडची एक बाजू सुरू करण्याची तयारी केली जात आहे. जवळजवळ 14 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन तयार केल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचा पहिला टप्पा वरळी (Worli) ते मरीन ड्राइव्ह (Marin Drive) पर्यंत असणार आहे. याशिवाय मरीन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत, जे दोन-दोन किलोमीटर लांबीचे आहेत.

1600 गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था असणार
कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरजेंच आहेत. पहिला इंटरजेंच अमरसन्स गार्डन (Amarsons Garden), दुसरा इंटरजेंच हाजी अली आणि तिसरा इंटरजेंच वरळीत आहे. या इंटरजेंचच्या दरम्यान पार्किंग व्यस्थेची सुविधा असणार आहे, जेथे 1600 गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात. संपूर्ण मार्ग आठ पदरी आणि बोगदा सहा पदरी असणार आहे. याशिवाय बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास तत्काळ मदतीसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल, पोलीस तैनात असणार आहेत.

दोन भागात विभागलाय कोस्टल रोडचा प्रकल्प
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. त्यानुसार, दक्षिण आणि उत्तर भागात हा प्रकल्प विभागला गेला आहे. या प्रकल्पामध्ये सर्वप्रथम दक्षिण भागाचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प, जो साडेदहा किलोमीटरचा भाग असून मरीन ड्राइव्ह ते प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरू होऊन वरळी वांद्रे-सी लिंकपर्यंत असणार आहे.

महिलांसाठी विशेष बसला हिरवा झेंडा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठीच्या विशेष बसेसना हिरवा झेंडा दाखवून  कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिका अंशतः खुली करण्याचा औपचारिक शुभारंभ केला आहे. 

पाहा कोस्टल रोडची झलक

पाहा कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या सोहळ्याचे LIVE 

YouTube video player

आणखी वाचा : 

Gokhale Bridge : आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र, पालिका आयुक्त आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची केली मागणी

दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानात धूम्रपान करणे प्रवाशाला पडले महागात, केली तुरुंगात रवानगी

Rajya Sabha Election 2024 : शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर