केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन यांचे मुंबईत निधन, अहमदाबाद येथे होणार अंत्यसंस्कार

| Published : Jan 15 2024, 04:59 PM IST / Updated: Jan 15 2024, 06:01 PM IST

amit shah

सार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे मुंबईत सोमवारी सकाळी निधन झाले आहे. राजेश्वरीबेन फुफ्फुसासंदर्भातील आजाराचा सामना करत होत्या.

Amit Shah's Elder Sister Passes Away : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह (Rajeshwariben Shah) यांचे निधन झाले आहे. राजेश्वरी 65 वर्षांच्या होत्या. राजेश्वरी यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. राजेश्वरी या फुफ्फुसासंबंधित आजाराचा सामना करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळेच त्यांना अहदमदाबाद येथून मुंबईत उपचारासाठी आणले होते.

राजेश्वरी यांच्यावर अहमदाबाद येथे उपचार सुरू होते. पण राजेश्वरी यांना फुफ्फुसाच्या आजारामुळे अधिक त्रास होऊ लागल्याने मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले होते. सोमवारी (15 जानेवारी) राजेश्वरी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. मोठ्या बहिणीच्या निधनामुळे अमित शाहांनी वेगवेगळे कार्यक्रम रद्द केले आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप पक्षातील नेतेमंडळींनी अमित शाह यांच्या बहीणीच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

अहमदाबाद येथे होणार अंत्यसंस्कार

अमित शाह अहमदाबाद येथेच आहेत. शाह यांचे अहमदाबादमध्ये काही कार्यक्रम असल्याने ते रविवारीच (14 जानेवारी) येथे आले होते. पण आता मोठ्या बहीणीच्या निधनामुळे शाह यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. राजेश्वरीबेन शाह यांच्यावर अहदमदाबाद येथील थलतेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा : 

Earthquake : अफगाणिस्ताननंतर दिल्ली आणि उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के

Lok Sabha Election : भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी ठरवली जातेय रणनिती, पक्ष लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

शेफ मनोहर राम मंदिरासाठी तयार करणार सात हजार किलोंचा ‘Ram Halwa’