सार

अफगाणिस्तानात 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. यानंतर आता दिल्ली आणि उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Earthquake in North India: अफगाणिस्तानात (Afghanistan) 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्ताननंतर आता गुरुवारी (11 जानेवारी) दुपारी दिल्ली (Delhi) आणि उत्तर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. याशिवाय पाकिस्तानातही भूकंपामुळे जमीन हादरल्याचे सांगितले जात आहे.

अफगाणिस्तानात 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप
अफगाणिस्तानात 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले गेले. यानंतर भारत व पाकिस्तानातील काही शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले गेले. दुपारी दिल्लीसह उत्तर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले गेले.

नॅशल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने (National Center for Seismology) ट्विटवरवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये 11 जानेवारीला दुपारी 2 वाजून 50 मिनिट 24 सेकंदावेळी 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेसह भूकंपाचे धक्के जाणवल्याचे म्हटले आहे. भूकंपाचे मुख्य  केंद्र अफगाणिस्तानातील काबुलपासून (Kabul) 241 किलोमीटर ईशान्य दिशेकडे होते. सध्या कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

दिल्ली आणि एनसीआर आहेत भूकंपाचे क्षेत्र
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) भूकंपाच क्षेत्र IV अंतर्गत येतात. हे क्षेत्र भूकंपाच्याप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. राष्ट्रीय राजधानीत सातत्याने भूकंपाचे झटके जाणवले जातात.

आणखी वाचा : 

Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प या दिवशी होणार सादर

PM Modi Lakshadweep Visit : जगभरात इंटरनेटवर लक्षद्वीपबद्दल करण्यात आले सर्वाधिक सर्च, मोडला 20 वर्षांचा रेकॉर्ड

Qatal Ki Raat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा इमरान खान यांच्यासोबत बातचीत करण्यास दिला नकार...वाचा 'कत्ल की रात'चा किस्सा