शेफ मनोहर राम मंदिरासाठी तयार करणार सात हजार किलोंचा 'Ram Halwa'
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर राम मंदिरासाठी सात हजार किलोंचा 'राम हलवा' तयार करून नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. शेफ यांच्या हातचा हलवा प्रसाद म्हणून भाविकांना वाटला जाणार आहे.
शेफ विष्णूंना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे खास आमंत्रण देण्यात आले आहे. शेफ यांच्याकडून तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाच्या उपक्रमाला ‘कार सेवक’ नाव देण्यात आले आहे.
दीड लाख भाविकांना राम हलवा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. या हलव्याच्या माध्यमातून रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावे विश्वविक्रम होणार असल्याचे शेफ यांनी म्हटले आहे.
राम हलव्यासाठी खास 1400 किलोची स्टीलची कढई वापरली जाणार आहे. या कढाईचा आकार 10 फूट बाय 10 फूट असल्याचे सांगण्यात आले आहे.
राम मंदिरासाठी तयार करण्यात येणाऱ्या हलव्यासाठी 900 किलो गहू, 1000 किलो तूप, 1000 किलो साखर, 2000 लिटर दूध, 2000 लिटर पाण्यासह ड्राय फ्रुट्स, वेलची पावडरचा वापर केला जाणार आहे.
शेफ विष्णू मनोहर राम मंदिरासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादासाठी येत्या 20 जानेवारीपर्यंत अयोध्येत येण्याची शक्यता आहे.