सार

दिग्गज व्यावसायिक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Ratan Tata hospitalised : जगप्रसिद्ध व्यावसायिक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर येत आहे. रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा 86 वर्षांचे आहेत. सोमवारी पहाटे रतन टाटा यांची प्रकृती यांची बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.

रुग्णालयासंबंधित सूत्रांनी म्हटले की, रतन टाटा यांना रात्री 12.30 ते 1 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा यांचे ब्लड प्रेशर कमी झाल्याने तातडीने आयसीयूमध्ये भरती केले. येथील प्रसिद्ध हृदय रोग स्पेशालिस्ट डॉ. शाहरुख अस्पी गोल वाला यांच्या नेतृत्वाखाली इंटेंसिव केअर स्पेशलिस्टची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे.

रतन टाटा यांचे ट्विट: 
रतन टाटा यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मला माझ्या आरोग्यासंबंधित पसरलेल्या अफवेबद्दल माहिती आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, हे दावे पोकळ आहेत. सध्या मी माझअया वय आणि आरोग्यासंबंधित चेकअपसाठी वैद्यकीय चाचणी करत आहे. चिंतेचे काही कारण नाही. सध्या मी उत्तम असून चुकीची माहिती पसरवू नये अशी विनंती करतो."

 

रतन टाटा यांचा जगभरात डंका
टाटा ग्रुपचे साम्राज्य उभारण्यासाठी जमशेतजी टाटा यांनी फार मेहनत केली. पण रतन टाटा यांनी व्यवसायाला उंच स्तरावर पोहोचवला आहे. वर्ष 1991 मध्ये टाटा ग्रुपची कमान दीर्घकाळ सांभाळल्यानंतर रतन टाटा यांनी जगभरात आपल्या व्यवसायाचा डंका वाजवला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन रतन टाटा यांनी वर्ष 2012 मध्ये राजीनामा दिला. यानंतर दिवंगत सायरस मिस्री यांच्याकडे व्यवसायाची कमान सोपवली होती. यावेळी काही असे मुद्दे उपस्थितीत झाले आणि मिस्री यांना पदावर काढून टाकण्यात आले. यानंतर वर्ष 2016 मध्ये पुन्हा एकदा रतन टाटा यांनी व्यवसायाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वर्ष 2017 मध्ये रतन टाटा यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर नटराजन चंद्रशेखर यांच्याकडून व्यवसायाची कमान दिली. दरम्यान, ट्रस्टची जबाबदारी रतन टाटा यांच्याकडून सांभाळली जात आहे.

आणखी वाचा : 

मुंबईतील वडापाव विक्रेत्याची वार्षिक कमाई २४ लाख, इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल

आगीत 2 मुलांसह 7 जणांचा मृत्यू, मुंबईत संपूर्ण कुटुंब झालं उध्वस्त