सार

इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर सार्थक सचदेवा यांनी एक दिवस वडापाव विक्री करून रस्त्यावरील विक्रेत्यांचे उत्पन्न जाणून घेतले. त्यांनी एका दिवसात ६२२ वडापाव विकून ९,३०० रुपये कमावले.

इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर सार्थक सचदेवाने स्थानिक वडापाव कार्टमध्ये काम करून एक दिवस घालवला आणि त्याला समजले की रस्त्यावरील विक्रेते सर्वात जास्त कमाई करत आहेत - रस्त्यावरील विक्रेत्याचे उत्पन्न अनेकांच्या तुलनेत जास्त आहे. स्ट्रीट फूड विकणारे विक्रेते सर्वात जास्त कमाई करताना दिसून येत आहेत. सचदेवाचा व्हिडिओला १० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. 

लोकप्रिय भारतीय स्नॅक विकण्यात एक दिवस घालवण्याचा अनुभव. व्हिडिओमध्ये, सचदेवा हा व्यवसाय कसा चालतो हे शिकून, गरम वडा बनवून दिवसाची सुरुवात करतो. सकाळपर्यंत तो जवळपास २०० वडापावची विक्री करतो. वडा पाव खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याचे त्याच्या विक्रीतून त्याला लक्षात आलं आहे. दिवसभरात, संध्याकाळपर्यंत एकूण 622 वडापावांची विक्री झाली असून 15 रुपये प्रति वडा पाव दराने ते विकले. दिवसाची कमाई 9,300 रुपये झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले.