जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी मुंबईकरांना त्रास होऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यांनी आंदोलकांना दोन तासांत मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत आणि शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.