- Home
- Mumbai
- Manoj Jarange Patil : कोण आहेत मनोज जरांगे पाटील? जाणून घ्या त्यांच्याविषयीच्या माहित नसलेल्या बाबी
Manoj Jarange Patil : कोण आहेत मनोज जरांगे पाटील? जाणून घ्या त्यांच्याविषयीच्या माहित नसलेल्या बाबी
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज (२९ ऑगस्ट) सकाळी मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात ते आजपासून उपोषणाला सुरुवात करत आहेत. लाखो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहे. जाणून घ्या जरांगे यांच्याबद्दल माहित नसलेल्या बाबी.
15

Image Credit : X
जाणून घ्या कोण आहेत मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली येथून मुंबईकडे रवाना झाले होते. आळे फाटा, शिवनेरी-खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर असा प्रवास करत आज सकाळी ते मुंबईत दाखल झाले. या आंदोलनामुळे “मनोज जरांगे पाटील नेमके कोण?” याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
25
Image Credit : X
मागील १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा
- पूर्ण नाव : मनोज रावसाहेब जरांगे-पाटील
- वय : ४३ वर्षे (जन्म १ ऑगस्ट १९८२)
- मूळ गाव : मातोरी, ता. गेवराई (जालना जिल्हा)
- चार भावांमध्ये सर्वात धाकटे
- पत्नीचे नाव सुमित्रा पाटील, चार अपत्ये (३ मुली, १ मुलगा)
- सध्या वास्तव्य : शाहगड, जालना
- मागील १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा
- शिवबा संघटनेची स्थापना करून आंदोलनांची सुरुवात
- आरक्षणाच्या लढ्यात स्वतःची २.५ एकर जमीन विकली
35
Image Credit : X
आतापर्यंतची उपोषणं
- २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ – अंतरवाली-सराटी
- २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३ – अंतरवाली
- २६-२७ जानेवारी २०२४ – नवी मुंबई
- १० ते २६ फेब्रुवारी २०२४ – अंतरवाली
- ४ ते १० जून २०२४ – अंतरवाली
- २० ते २४ जुलै २०२४ – अंतरवाली
- २५ ते ३० जानेवारी २०२५ – अंतरवाली
- २९ ऑगस्ट २०२५ – आझाद मैदान, मुंबई
45
Image Credit : X
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा आणि कुणबी एकच आहेत, याची अंमलबजावणी व्हावी.
- हैदराबाद गॅझेटियर लागू करावा, सातारा व बॉम्बे गॅझेटियरचा आधार घ्यावा.
- सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून पात्रांना आरक्षण द्यावे.
- आंदोलकांवर झालेल्या गुन्ह्यांची माफी व्हावी.
- कायद्यात बसणारे स्थायी आरक्षण द्यावे.
55
Image Credit : X
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आझाद मैदानात सुरू होणारे हे आंदोलन किती तीव्र रूप धारण करणार आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आजपासून उपोषण सुरु झालं आहे. यावर सरकारकडून कोणत्या वाटाघाटी केल्या जातात हे बघण्यासारखे असेल. गेल्या वेळी जेव्हा जरांगे मुंबईत आले होते तेव्हा वाशी येथूनच परत गेले होते. पण यावेळी ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत.

