MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Manoj Jarange Patil : हॉटेलात टेबल पुसले, पत्र्याच्या घरात राहिले, १२ वी नंतर शिक्षण सोडले, वाचा थक्क करणारा प्रवास

Manoj Jarange Patil : हॉटेलात टेबल पुसले, पत्र्याच्या घरात राहिले, १२ वी नंतर शिक्षण सोडले, वाचा थक्क करणारा प्रवास

मागील १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी जिवाचे रान करणारे मनोज जरांगे पाटील आज घराघरात चर्चेत आहेत. या लढ्यात त्यांनी स्वतःची जमीनही विकली. एकेकाळी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष राहिलेले जरांगे पाटील आज मराठा समाजाचे आक्रमक नेते झाले आहेत.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Aug 29 2025, 01:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
हॉटेलात केले काम
Image Credit : fb

हॉटेलात केले काम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा त्यात केला आहे. त्यांनी घरादारावर चक्क तुळशीपत्र ठेवले आहे. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी या आंदोलनात स्वतःला झोकून दिले आहे. 

बारावीनंतर शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी हॉटेलवर काम करणारा हा तरुण, समाजकारणासाठी आयुष्य झोकून देईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण काळाच्या ओघात त्यांचे जीवन पूर्णपणे समाजाच्या सेवेसाठी वळलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
दुचाकी-चारचाकी नसलेला नेता, पण लाखोंचा ताफा सोबत
Image Credit : fb

दुचाकी-चारचाकी नसलेला नेता, पण लाखोंचा ताफा सोबत

मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आजही ना दुचाकी आहे ना चारचाकी वाहन. साध्या पत्र्याच्या घरात राहणारे हे नेते, जेव्हा अंतरवाली सराटीतून "चलो मुंबई"चा नारा देत निघाले, तेव्हा त्यांच्या मागे हजारो वाहनांचा आणि लाखो मराठ्यांचा ताफा उभा राहिला.

२७ ऑगस्ट रोजी सुरू झालेला त्यांचा मोर्चा मुंबईत पोहोचताच राज्यभरातच नव्हे तर देशभरात त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली.

Related Articles

Related image1
Manoj Jarange Patil Morcha : 'डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय येथून हलणार नाही', मुंबईतील आझाद मैदानावरील जरांगेंच्या पहिल्या भाषणातील ठळक मुद्दे
Related image2
Manoj Jarange Patil : कोण आहेत मनोज जरांगे पाटील? जाणून घ्या त्यांच्याविषयीच्या माहित नसलेल्या बाबी
36
बीडमधून जालना, शिक्षण सोडून चळवळीत प्रवेश
Image Credit : X

बीडमधून जालना, शिक्षण सोडून चळवळीत प्रवेश

मनोज जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील. वडील जवळपास वीस वर्षांपूर्वी जालन्यात स्थायिक झाले. शिक्षण बारावीनंतर थांबले, पण समाजकारणात रुची वाढली. उदरनिर्वाहासाठी हॉटेलवर काम केले आणि एकामागून एक ३० हून अधिक आंदोलने केली.

46
समाजकारणासाठी जमीन विकावी लागली
Image Credit : X

समाजकारणासाठी जमीन विकावी लागली

आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. २०१३ मध्ये त्यांनी ‘शंभुराजे’ हे नाटक बीड, जालना, अंबड, शहागड येथे आयोजित केले. मात्र जालना येथील प्रयोगादरम्यान अपघातात हत्ती आणि दोन घोडे मृत्युमुखी पडले. त्यामुळे केस झाली, नुकसानभरपाईचा भार आला आणि शेवटी जरांगेंना स्वतःची जमीन विकावी लागली.

56
काँग्रेसपासून शिवबा संघटनेपर्यंत
Image Credit : social media

काँग्रेसपासून शिवबा संघटनेपर्यंत

मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम केले. ते जालन्यात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही राहिले. पण विचारभिन्नतेमुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि राजकारणातून बाहेर पडले. यानंतर त्यांनी ‘शिवबा संघटना’ स्थापन करून मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यास आणि सोडवण्यास सुरुवात केली.

66
एका शब्दावर लाखो मराठे मुंबईत
Image Credit : social media

एका शब्दावर लाखो मराठे मुंबईत

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लाखो मराठ्यांना आवाहन केले. त्यांनतर लाखोच्या संख्येने गावागावातील मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी मुंबई जाम केली आहे. मुंबईत पाय ठेवून दाखव म्हणणार्या नेत्यांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. 

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मुंबई बातम्या
मनोज जरांगे पाटील

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Property : मुंबईत घर खरेदीची धूम! सप्टेंबरमध्ये १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला, पण महसूल घटला
Recommended image2
Mumbai Crime : मालाडच्या क्लिनिकमध्ये ४ वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह, पोलीसही चक्रावले
Recommended image3
Rapido Ride: मुंबईत रॅपिडो बुक केली, पण बाईक चालवणारी व्यक्ती पाहून ती म्हणाली, 'सर्वांत सुरक्षित प्रवास!'
Recommended image4
Geyser Safety Tips : 6 महिन्यांनंतर गिझर चालू करताय? ही चूक अजिबात करू नका
Recommended image5
Mumbai Local Train : विरार-चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशाची दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल
Related Stories
Recommended image1
Manoj Jarange Patil Morcha : 'डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय येथून हलणार नाही', मुंबईतील आझाद मैदानावरील जरांगेंच्या पहिल्या भाषणातील ठळक मुद्दे
Recommended image2
Manoj Jarange Patil : कोण आहेत मनोज जरांगे पाटील? जाणून घ्या त्यांच्याविषयीच्या माहित नसलेल्या बाबी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved