सरकारने मराठा आरक्षणासाठी एक-दोन दिवसांची परवानगी दिली असली तरी, मनोज जरांगे यांनी पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी इंग्रजांपेक्षाही सरकार बेकार असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई: सरकारने काय म्हटलं मला माहित नाही. सरकारने आज आणि उद्याची उपोषणाची परवानगी दिली आहे. मराठ्यांचे मन जिंकण्याची सरकारला ही सुवर्णसंधी आहे. गोर गरिबांचे मन जिंकण्याची ही सगळ्यात मोठी संधी चालून आली आहे. एक एक दिवस उपोषणाला परवानगी देण्यापेक्षा हे उपोषण पूर्ण आरक्षण दिल्याशिवाय उठणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
गोळ्या घालून मारायचं का, हे सरकारच्या हातात
गोळ्या घालून मारायचं का, हे सरकारच्या हातात असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. लघवी, संडासचे ठिकाण बंद केले, पोरांना खायला आजूबाजूचे दुकान बंद केले, मराठ्यांची पोर त्यांच्यामुळं सीएसटीवर जाऊन बसले होते. सरकारने परवानगी दिली की आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करणार आहोत असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
इंग्रजांपेक्षा तुम्ही बेकार
इंग्रजांपेक्षा सरकार बेकार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकार आडमुठ्यात घुसलं की आम्ही आडमुठ्यात घुसणार आहोत. तुम्ही मुंबई जाम केली ती सुरक्षित ठिकाणी लावणार आहोत. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करणार आहोत. परिस्थिती ही सरकारने जाणून घेणं गरजेचं आहे. एक एक दिवस रडक्यासारखी परवानगी देत आहात.
जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी तो मराठ्याचंच कार्यकर्ता आहे. तुम्ही मुंबईत जर अशी वागणूक दिली तर तुमच्या नेत्याच्या, कार्यकर्त्याच्या सभा अशाच होणार आहेत. तुमच्याकडे आम्ही आल्यावर तुम्ही त्रास देणार म्हटल्यावर आम्ही तुम्हाला त्रास देणार. आम्ही मुंबईत आल्यावर हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत.
