हॉटेल बंद ठेवल्याबद्दल मनोज जरांगे यांनी सरकारवर आसूड ओढले आहेत. सरकार आडमुठे वागल्यास मराठेही तसेच वागतील असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठ्यांच्या मुलांशी वाईट वागू नका, ते पोर हे लक्षात ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई: हॉटेल बंद ठेवल्याबद्दल मनोज जरांगे यांनी सरकारवर आसूड उपसले आहे. आम्ही जशाला तसे उत्तर देणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. शांतता आणि संयम हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. मराठ्यांच्या पोरांशी वाईट वागू नका, ते पोर हे लक्षात ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारनं गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं असं त्यांनी बोलताना म्हटलं आहे.
सरकार आडमुठे वागल्यास मराठे आडमुठे वागणार
सरकार आडमुठे वागत असल्यास मराठे तसेच वागणार असल्याचं यावेळी जरांगे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. जशाला तस उत्तर देणार असल्याचं त्यांनी यावेळी आक्रमकपणे सांगितलं आहे. मुंबईत आल्यावर सरकार आमच्याशी कसं वागलं हे आम्ही लक्षात ठेवलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आंदोलकांबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कानाकोपऱ्यात तुम्हाला मराठे दिसणार आहेत कानाकोपऱ्यात तुम्हाला मराठे दिसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. शांततेचा मार्ग सोडणार नसून आम्ही आरक्षण मिळवून जाणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. सरकारची भूमिका इंग्रजांपेक्षा बेकार असल्याचं मत यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठे माज नाही तर वेदना घेऊन मुंबईत आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जशाला तसं उत्तर देणार
जशाला तसं उत्तर देणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षण काढून आम्हाला द्या असं आम्ही म्हणत नाही. सरकारसोबत संवाद साधायचं आमचं काम नाही. सरकार आडमुठे वागल्यास आम्ही तसेच वागणार असल्याचं जरांगे यावेळी बोलताना म्हटले आहेत. गोळ्या खायला आम्ही तयार असल्याचं जरांगे यावेळी म्हटलं आहे.

