कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (17 मे) मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या मंचावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेही जनतेला संबोधित करणार आहेत. अशातच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली . या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
येत्या वर्षभरातच मुंबई उपनगरातील घरांच्या किमती किमान 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. TDR मध्ये दुपटीनं वाढ झाल्यानं घरांच्या किमतींत वाढ होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
पीएम मोदी यांची कल्याणला सभा असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनास ठाणे हद्दीत मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत काल अवजड वाहनांना थांबवण्यात आलं होतं.
घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.
येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक आता पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
मुंबईतील चेंबूर भागात शिवसेनेच्या (UBT) रॅलीत कथितरित्या उभारलेल्या इस्लामिक ध्वजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण परिसरात आज देखील वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तर मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.