Dadar Kabutar Khana : दादर कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाचा विरोध करत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. “नवीन कबुतरखाना नको, जुना उघडा” अशी मागणी करत त्यांनी 3 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील 5.3 किमी जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी चित्रनगरी परिसरात प्राथमिक उत्खनन वेगात सुरू आहे. पहिल्या टीबीएमचे घटक दाखल झाले आहेत.
CIDCO Homes: सिडकोच्या घरांच्या वाढीव दरांवरून निर्माण झालेल्या वादानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत दरकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local: २ नोव्हेंबरला मुंबईतील मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केलाय. या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्या रद्द होतील किंवा त्यांच्या वेळापत्रकात बदल होईल.
Mumbai : मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेकडून मतदारयादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढला जात आहे. फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा मुंबई महापालिकेवर समाप्त होईल.
Mumbai Hostage Crisis : मुंबईच्या पवई परिसरातील ओलीस प्रकरणातील आरोपी रोहित आर्यबाबत नवे खुलासे झाले आहेत. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमातील ‘लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा तो संचालक असल्याचं समोर आलं आहे.
Mumbai : महाविकास आघाडीने मुंबईतील मतदार यादीतील घोळांविरोधात १ नोव्हेंबरला मोठा मोर्चा जाहीर केला आहे. सध्या न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली असून काँग्रेसच्या अंतिम निर्णयानंतर पुढील आंदोलनाचा आराखडा ठरणार आहे.
मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने एका ॲक्टिंग स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवले, ही घटना 'ए थर्सडे' चित्रपटाची आठवण करून देणारी होती. मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने ऑपरेशन राबवून सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पहिल्या टप्प्यात, एअर इंडिया एक्सप्रेस दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार आहे.
Maharashtra Farmers Protest : महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन नागपुरात दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलकांनी नागपूरला हैदराबादशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग-44 रोखून धरला आहे.
mumbai