- Home
- Maharashtra
- Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी झेप! पहिल्या टप्प्यात ‘या’ ५ मेट्रो शहरांसाठी थेट विमानसेवा; कधी होणार सेवा सुरू?
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी झेप! पहिल्या टप्प्यात ‘या’ ५ मेट्रो शहरांसाठी थेट विमानसेवा; कधी होणार सेवा सुरू?
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पहिल्या टप्प्यात, एअर इंडिया एक्सप्रेस दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार आहे.

पहिल्या टप्प्यात ‘या’ ५ मेट्रो शहरांसाठी थेट विमानसेवा
Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठी खुशखबर! लवकरच हा विमानतळ प्रवाशांसाठी खुला होणार असून, पहिल्या टप्प्यात पाच प्रमुख शहरांना थेट जोडले जाईल, ज्यामुळे प्रवास अधिक सोपा, वेगवान आणि सुविधा संपन्न होईल.
‘या’ शहरांना थेट कनेक्टिव्हिटी
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस नवी मुंबई विमानतळावरून दररोज खालील शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू करणार आहे.
दिल्ली
बंगळुरू
चेन्नई
हैद्राबाद
कोलकाता
पहिल्या टप्प्यात दररोज 20 फ्लाइट्स 15 पेक्षा जास्त शहरांशी जोडल्या जातील. येत्या काळात म्हणजे 2026 पर्यंत, एकूण 55 फ्लाइट्स, ज्यात पाच आंतरराष्ट्रीय मार्गांचा समावेश असेल, चालवल्या जातील.
इंडिगो आणि अकासा एअरची योजना
इंडिगो: सुरुवातीला 15 शहरांसाठी उड्डाणे सुरू, नंतर एकूण 36 देशांतर्गत शहरांना जोडण्याची योजना. एकूण 158 उड्डाणे, त्यापैकी 14 आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी.
अकासा एअर: दररोज 40 उड्डाणे, त्यामध्ये 8 ते 10 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स.
यामुळे प्रवाशांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दुहेरी सुविधा मिळणार आहेत.
नवी मुंबई विमानतळ, भारतातील नवे एव्हिएशन हब
या विमानतळाच्या सुरूवातीमुळे नवी मुंबई देशातील महत्त्वाचे एव्हिएशन हब म्हणून उभे राहणार आहे. प्रवाशांसाठी हे सुविधापूर्ण, वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा नवा अनुभव देणार आहे.

