- Home
- Mumbai
- Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! नोव्हेंबरच्या पहिल्याच रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, काही लोकल रद्द
Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! नोव्हेंबरच्या पहिल्याच रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, काही लोकल रद्द
Mumbai Local: २ नोव्हेंबरला मुंबईतील मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केलाय. या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्या रद्द होतील किंवा त्यांच्या वेळापत्रकात बदल होईल.

नोव्हेंबरच्या पहिल्याच रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मुंबई: नोव्हेंबरचा पहिलाच रविवार मुंबईकरांसाठी थोडा अडचणीचा ठरणार आहे. कारण उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबर (रविवार) रोजी मुंबईतील मध्य रेल्वे, हार्बर लाईन आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे पार पाडण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या कामादरम्यान काही गाड्या रद्द करण्यात येतील, तर काहींच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाचं नियोजन करताना वेळापत्रक जरूर तपासावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
चार स्थानकांवर थांबा रद्द
या ब्लॉकदरम्यान करी रोड, चिंचपोकळी, मशीद आणि सँडहर्स्ट रोड या चार स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार नाहीत. करी रोड आणि चिंचपोकळी या दोन्ही स्थानकांना ‘जुळी स्थानके’ म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना थोडी गैरसोय होऊ शकते.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग):
ब्लॉक रूट: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार
वेळ: सकाळी 10:55 ते दुपारी 3:55
या काळात काही गाड्या उशिराने धावतील किंवा त्यांच्या वेळा बदलल्या जातील. दुपारी साडेतीननंतर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होईल.
हार्बर मार्ग:
ब्लॉक रूट: कुर्ला ते वाशी
वेळ: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10
या वेळेत हार्बर मार्गावरील काही लोकल सेवा रद्द राहतील. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा.
पश्चिम रेल्वे:
ब्लॉक रूट: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (जलद मार्ग)
वेळ: सकाळी 10:35 ते दुपारी 3:35
या ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेची रेल्वे वाहतूक बंद राहील. काही गाड्या दादर किंवा वांद्रे येथेच थांबवल्या जातील.
प्रवाशांसाठी सूचना
मेगाब्लॉकची नियोजित वेळ संपल्यानंतर सर्व रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत सुरू होतील. मात्र, प्रवाशांनी रविवारी प्रवासाचं नियोजन करताना रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा रेल्वे हेल्पलाइनवरून ताज्या अपडेट्स तपासाव्यात.

