सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (17 मे) मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या मंचावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेही जनतेला संबोधित करणार आहेत. अशातच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

Mumbai Traffic Advisory : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभेच्या जागांसाठी 20 मे ला मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघर आणि भिवंडीत मोठा विजय मिळवण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. अशातच प्रचार तोफा थंडावण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) शुक्रवारी (17 मे) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा आहे. याच मंचावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेही (Raj Thackeray) जनतेला संबोधित करणार आहेत. अशातच सभेसाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नो पार्किंग झोनची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवेळी वाहतूकीवर 16 मे रात्री 10 वाजल्यापासून ते 17 मे पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय काही ठिकाणांना नो पार्किंग झोनही घोषित केले आहे.

वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते

  • स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग - बाबासाहेब वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम
  • संपूर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादर
  • संपूर्ण एम.बी. राऊत मार्ग, शिवाजी पार्क, दादर
  • पांडुरंग नाईक मार्ग (शिवाजी पार्क रोड क्रमांक-5), शिवाजी पार्क, दादर
  • दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क
  • दिलीप गुप्ते मार्ग- शिवाजी पार्क गेट क्रमांक 4 ते शितलादेवी रोज, शिवाजी पार्क, दादर
  • एल.जे. रोड- गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहिम.
  • एनसी केळकर मार्ग- हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क
  • टी.एच. कटारिया मार्ग- गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहिम
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड- महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)
  • टिळक रोड- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर, ए. किडवाई रोड, माटुंगा (पूर्व)
  • खान अब्दुल गफारखान रोड- सी लिंक गेट ते जे. के. कपुर चौक ते बिंदु माधव ठाकरे चौक
  • थडानी मार्ग -पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक
  • डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड -पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन

वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग

1) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी - श्री सिद्धीविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन

पर्यायी मार्ग : श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेऊन एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोर्जुगिज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले रोड मार्ग या रस्त्यांचा वापर करावा.

2) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी - येस बँक जंक्शन ते श्री. सिद्धिविनायक मंदिर जंक्शन.

पर्यायी मार्ग : दांडेकर चौक येथे डावे वळण घेऊन पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेऊन एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा.

आणखी वाचा : 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीच्या लांबच लांब रांगा

मुंबई घर घ्यायचं स्वप्न स्वप्नचं राहणार?, TDR मध्ये दुपटीनं वाढ झाल्याने घरांच्या किमती 25% वाढण्याची शक्यता