MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढला, कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढला, कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून मुंबईत अचानक एवढा पाऊस का पडतोय याबद्दल हवामान खात्याने स्पष्टीकरण दिले आहे. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 19 2025, 09:47 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईत मुसळधार पाऊस
Image Credit : X

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबईसह पुणे आणि राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. पुणे वेधशाळेने (IMD Pune) पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दोन दिवस पाऊस तीव्र राहील आणि त्यानंतर त्याचा जोर काहीसा कमी होईल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव
Image Credit : Getty

कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव

पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याने द्रोनीय रेषा (Trough Line) उत्तर कोकण ते केरळपर्यंत पसरली आहे. यामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून, उर्वरित भागात सरी कोसळत आहेत.

Related Articles

Related image1
Thane School Update: ठाण्यात पावसाचा कहर; 18 आणि 19 ऑगस्टला शाळांना सुट्टी, पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
Related image2
Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे सर्व खासगी तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांना सुट्टी
35
पुढील दोन दिवसांचा पावसाचा अंदाज
Image Credit : Asianet News

पुढील दोन दिवसांचा पावसाचा अंदाज

हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी गंभीर इशारे दिले आहेत.

  • कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट – मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
  • मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यांवर रेड अलर्ट.
  • समतल भागांना ऑरेंज अलर्ट, त्यानंतर यलो अलर्ट.
  • मराठवाडा – आज ऑरेंज अलर्ट, उद्यापासून यलो अलर्ट.
  • विदर्भ – आज ऑरेंज अलर्ट, उद्या यलो अलर्ट.
45
मुख्यमंत्री फडणवीस यांचा पूरस्थितीवर आढावा
Image Credit : Asianet News

मुख्यमंत्री फडणवीस यांचा पूरस्थितीवर आढावा

राज्यात वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये दाखल होऊन आढावा घेतला. पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

55
आपत्ती व्यवस्थापनाची तयारी
Image Credit : Getty

आपत्ती व्यवस्थापनाची तयारी

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर, अडकलेल्या लोकांची सुटका आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना यावर चर्चा केली. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पावसाच्या तीव्रतेवर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात का ठेवला, विधिमंडळ परिसरात आज काय घडलं?
Recommended image2
Mumbai Local Crime : मुंबई लोकलमध्ये तो त्याच्यावर वार करत होता, आणि सर्व घाबरुन पाहत होते
Recommended image3
Mumbai Rain : मुंबईत पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट; काय आहे IMD चा अंदाज?
Recommended image4
Mumbai Monsoon Update : मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याकडून यलो अ‍ॅलर्ट जारी
Recommended image5
आमची जिरली, बाबाही गेले आणि दशम्याही गेल्या! ओमदादा तुमचं पेज आता उबाठाला
Related Stories
Recommended image1
Thane School Update: ठाण्यात पावसाचा कहर; 18 आणि 19 ऑगस्टला शाळांना सुट्टी, पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय
Recommended image2
Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे सर्व खासगी तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांना सुट्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved