MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Konkan Railway Shimga Special Trains: शिमग्याक चला कोकणात! मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी 'मास्टरस्ट्रोक'; आता वेटिंगचं टेन्शन विसरा!

Konkan Railway Shimga Special Trains: शिमग्याक चला कोकणात! मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी 'मास्टरस्ट्रोक'; आता वेटिंगचं टेन्शन विसरा!

Konkan Railway Shimga Special Trains: मध्य रेल्वेने शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस या लोकप्रिय गाड्यांना कायमस्वरूपी अतिरिक्त 3AC इकोनॉमी कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 24 2026, 10:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शिमग्याक चला कोकणात! मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी 'मास्टरस्ट्रोक'
Image Credit : Asianet News

शिमग्याक चला कोकणात! मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी 'मास्टरस्ट्रोक'

मुंबई : "चाकरमान्यांनो, यंदाचा शिमगो सुखाचा होणार!" कोकणच्या लाल मातीची ओढ आणि ग्रामदेवतेच्या पालखीचा सोहळा अनुभवण्यासाठी गावी जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वेने 'मास्टरस्ट्रोक' मारला आहे. दरवर्षी रेल्वेच्या वेटिंग लिस्टमुळे होणारा प्रवासाचा 'वनवास' आता संपणार असून, कोकणातील सर्वात लोकप्रिय गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

25
आता कन्फर्म तिकीट मिळणं होणार सोपे!
Image Credit : social media

आता कन्फर्म तिकीट मिळणं होणार सोपे!

कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्यांना नेहमीच प्रवाशांची प्रचंड पसंती असते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने या गाड्यांमध्ये एक अतिरिक्त 3AC इकोनॉमी कोच (Economy Coach) कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दररोज शेकडो प्रवाशांना अतिरिक्त बर्थ उपलब्ध होणार आहेत. 

Related Articles

Related image1
Pune Railway Station Crowd Control: पुणे रेल्वे स्थानकावर 'गर्दी' मॅनेजमेंटचा नवा पॅटर्न! होळीला गावी जाताय? मग हे वाचाच...
Related image2
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरणार; रेल्वेकडून 'होळी स्पेशल' गाड्यांची घोषणा
35
कसं असेल नव्या कोचचं वेळापत्रक?
Image Credit : Asianet News

कसं असेल नव्या कोचचं वेळापत्रक?

तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी खालील तारखा लक्षात ठेवा.

२०१११ सीएसएमटी-मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस: २५ फेब्रुवारीपासून नवीन डबा जोडला जाईल.

२०११२ मडगाव-सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेस: २४ फेब्रुवारीपासूनच ही सुविधा सुरू झाली आहे.

१०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस: २५ फेब्रुवारीपासून नवा कोच प्रवाशांच्या सेवेत येईल.

१०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस: २५ फेब्रुवारीपासून हा बदल लागू होईल. 

45
महत्त्वाची टीप
Image Credit : ANI

महत्त्वाची टीप

यासोबतच मुंबई-सिकंदराबाद दुरंतो एक्सप्रेस आता पूर्णपणे वातानुकूलित (Full AC) करण्यात आली आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक आराम मिळेल. 

55
गर्दी आणि वेटिंग लिस्टला मिळणार 'पूर्णविराम'
Image Credit : twitter

गर्दी आणि वेटिंग लिस्टला मिळणार 'पूर्णविराम'

होळी आणि शिमग्याच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि एसटी बसमधील गर्दी पाहून अनेकजण गावी जाण्याचे टाळतात. मात्र, आता रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर, स्वस्त आणि गारेगार होणार आहे. ३ एसी इकोनॉमी कोचमुळे कमी खर्चात प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येईल. 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Weather Alert: महाराष्ट्रावर अस्मानी संकट! पुढचे ४८ तास विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ; 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी!
Recommended image2
Pune Railway Station Crowd Control: पुणे रेल्वे स्थानकावर 'गर्दी' मॅनेजमेंटचा नवा पॅटर्न! होळीला गावी जाताय? मग हे वाचाच...
Recommended image3
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरणार; रेल्वेकडून 'होळी स्पेशल' गाड्यांची घोषणा
Recommended image4
पाप लपवण्यासाठी मृत्यूला मिठी! पुण्यात स्पा सेंटरवर छापा पडताच महिलेचा करुण अंत; मॅनेजरची अवस्था गंभीर!
Recommended image5
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात
Related Stories
Recommended image1
Pune Railway Station Crowd Control: पुणे रेल्वे स्थानकावर 'गर्दी' मॅनेजमेंटचा नवा पॅटर्न! होळीला गावी जाताय? मग हे वाचाच...
Recommended image2
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरणार; रेल्वेकडून 'होळी स्पेशल' गाड्यांची घोषणा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved