सार

Mumbai Local : नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वेळी बहुसंख्य नागरिक घराबाहेर पडतात. यामुळेच पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून नववर्षाच्या मध्यरात्री स्पेशल लोकल ट्रेन चालवल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे.

Mumbai New Year Special Local : नववर्षाच्या स्वागतासाठी खास पार्टी, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी एखाद्या ठिकाणी लोकलच्या माध्यमातून प्रवास करणार असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण नववर्षाच्या मध्यरात्री काही स्पेशल लोकल धावणार आहेत.

पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून नवं वर्षाच्या मध्य रात्री स्पेशल लोकल ट्रेन (Special Local Train) चालवणार असल्याची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी 31 डिसेंबर, 2023 आणि 1 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीदरम्यान स्पेशल लोकल धावणार आहेत.

लोकलच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांसाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर काही स्पेशल लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून याचे वेळापत्रक देखील जारी केले आहे. या सर्व विशेष उपनगरीय गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पाहा वेळापत्रक

मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावर स्पेशल लोकल ट्रेन ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मध्यरात्रीनंतर 1 वाजून 30 मिनिटांनी लोकल निघणार असून मध्यरात्री 03 वाजता कल्याण स्थानकात पोहोचणार आहे. तसेच एक विशेष लोकल ट्रेन कल्याण येथून रात्री 01 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून मध्यरात्री 03 वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचणार आहे.

हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन सीएसएमटी येथून रात्री 01 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून रात्री 02 वाजून 50 मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहोचणार आहे. याशिवाय एक स्पेशल लोकल ट्रेन पनवेल येथून रात्री 01 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून मध्यरात्री 02 वाजून 50 मिनिटांनी मुंबईतील सीएसएमटी स्थानकात पोहोचणार आहे.

पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावरही रात्री उशिरा स्पेशल लोकल ट्रेन धावणार आहे. या मार्गावर 31 डिसेंबर (2023)/1 जानेवारी (2024)च्या दरम्यान रात्री चार अतिरिक्त लोकल ट्रेन धावणार आहेत. याचे वेळापत्रक खाली पाहा-

 

आणखी वाचा: 

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

Section 144 : मुंबईत येत्या 18 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू, या गोष्टींसाठी असणार बंदी

धक्कादायक! बदलापुरात ट्रेनच्या डब्याचा दरवाजा केला बंद, ऐन गर्दीच्या वेळेस प्लॅटफॉर्मवर उडाला मोठा गोंधळ