सार
Section 144 In Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबईत एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आला आहे. यादरम्यान कोणत्या गोष्टींसाठी बंदी असणार याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Section 144 In Mumbai : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबईत येत्या 18 जानेवारी (2024) पर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी शहारातील कायदे आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती एक परिपत्रक जाहीर करत दिली आहे.
या परिपत्रकानुसार, मुंबईत बुधवार (20 डिसेंबर 2023) पासून ते 18 जानेवारी (2024) पर्यंत कलम 144 लागू असणार आहे. म्हणजेच शहरात पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित जमण्यास बंदी असणार आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात करणार कारवाई
सार्वजनिक सभेवरीही येत्या 18 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, जमावबंदीदरम्यान शहरात लाऊड स्पीकर, बॅण्ड वाजवणे आणि फटाखे फोडण्यास बंदी असणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईही केली जाणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या गोष्टींसाठी असणार बंदी
- लाऊड स्पीकर, बॅण्ड वाजवणे आणि फटाके फोडण्यास बंदी असणार आहे.
- जमावबंदी लागू असल्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- जमावबंदीदरम्यान सभा आणि आंदोलनावर बंदी असणार आहे.
- न्यायलये, शासकीय कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आसपास नागरिकांना गर्दी करण्यास बंदी असणार आहे.
- सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी किंवा निदर्शने करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
- माइक्रो-लाइट विमान, पॅरा ग्लाइडर, पॅरा मोटर, हॅण्ड ग्लाइडर आणि हॉट एअर बलून इत्यादी गोष्टींवरही जमावबंदीदरम्यान बंदी असणार आहे.
मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
आदेशात हे देखील सांगण्यात आले आहे की, परिपत्रकाची प्रत पोलीस स्थानक, विभागीय एसीएसपी (ACSP), झोनल डीसीएसपी (Zonal DCSP), महापालिकेचे प्रभाग कार्यालय, तहसील आणि प्रभाव कार्यालयांच्या सूचना फलकांवर लावाली. याशिवाय यासंदर्भातील माहिती मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आणखी वाचा:
Mumbai Crime : कुरिअर कंपनीत 4 कोटी रूपयांची चोरी, पोलिसांनी 30 तासात चोरट्यांना ठोकल्या बेड्या