मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मेट्रो लाइन-3 ‘ॲक्वा लाईन’ नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर सुरू
Mumbai Metro Update : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नववर्षाच्या पूर्वसंध्येला मेट्रो लाईन-3 ॲक्वा लाईन रात्रभर चालवण्याची घोषणा केली. ही विशेष सेवा 31 डिसेंबरला रात्री 10:30 पासून 1 जानेवारी 2026 सकाळी 05:55 पर्यंत आरे ते कफ परेड मार्गावर उपलब्ध असेल

मुंबईकरांसाठी गुड न्यूज!
Mumbai Metro Update : मुंबईकरांसाठी नववर्षाच्या सेलिब्रेशनचा अनुभव आता आणखी सोयीस्कर होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने घोषणा केली आहे की, मेट्रो लाईन-3 (ॲक्वा लाईन) नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्रभर चालवली जाईल. यामुळे थर्टीफर्स्टच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स किंवा इतर सेलिब्रेशन स्पॉट्सला जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.
रात्रभर मेट्रो सेवा, वेळ आणि मार्ग
दिनांक: 31 डिसेंबर 2025
सुरुवात: रात्री 10:30
समाप्ती: 01 जानेवारी 2026 सकाळी 05:55
मार्ग: आरे JVLR ते कफ परेड
01 जानेवारीपासून मेट्रोची नियमित सेवा सकाळी 05:55 पासून सुरू होईल.
रात्रभर सेवा का महत्त्वाची?
मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. रस्त्यांवरील ट्रॅफिक कोंडी टाळणे आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी ॲक्वा लाईन रात्रभर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः महिलांसाठी आणि कुटुंबांसाठी हा निर्णय अत्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.
प्रवाशांसाठी सूचना
MMRC ने प्रवाशांना आवाहन केले आहे की,
नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे.
रात्रभरच्या विशेष सुविधांचा योग्य उपयोग करावा.
यामुळे आता मध्यरात्री घरी परतताना टॅक्सी किंवा रिक्षाची चिंता करावी लागणार नाही, आणि प्रवाशांना सेलिब्रेशनचा आनंद सुरक्षितपणे घेता येईल.

