MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Chhava Ride Government Taxi App: ओला-उबरला रामराम! महाराष्ट्रात येतंय हक्काचं 'सरकारी' ॲप; आता प्रवास होणार स्वस्त!

Chhava Ride Government Taxi App: ओला-उबरला रामराम! महाराष्ट्रात येतंय हक्काचं 'सरकारी' ॲप; आता प्रवास होणार स्वस्त!

Chhava Ride Government Taxi App: खाजगी कॅब कंपन्यांच्या मनमानीला पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकार छावा राईड हे नवीन टॅक्सी अॅप सुरू करतंय. एसटी महामंडळ आणि परिवहन विभागामार्फत चालवली जाणारी ही सेवा प्रवाशांना कमी दरात सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देईल. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 08 2026, 03:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
महाराष्ट्रात धावणार सरकारी 'छावा राईड'
Image Credit : our own

महाराष्ट्रात धावणार सरकारी 'छावा राईड'

मुंबई : टॅक्सीसाठी तासनतास वाट पाहणे, ऐनवेळी होणारे 'राईड कॅन्सल' आणि अव्वाच्या सव्वा भाडेवाढ... या सर्व त्रासातून आता महाराष्ट्रातील जनतेची सुटका होणार आहे. खाजगी कॅब कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून, लवकरच 'छावा राईड' (Chhava Ride) नावाचे सरकारी टॅक्सी अॅप लाँच होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय आहे सरकारची नवी योजना?
Image Credit : Freepic

काय आहे सरकारची नवी योजना?

एसटी महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरू केली जाणार आहे. 'भारत टॅक्सी'च्या यशस्वी पावलावर पाऊल ठेवत, आता 'छावा राईड'च्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा प्रवास मिळणार आहे. 

Related Articles

Related image1
Mumbai Water Cut Alert: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' भागांत ३० तास पाणी कापला जाणार; पाहा कुठे आणि कधी होणार पाणीबाणी?
Related image2
Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबईकरांची लोकल ‘स्लो’, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळ आणि ठिकाणं जाणून घ्या
35
'छावा राईड'ची खास वैशिष्ट्ये
Image Credit : our own

'छावा राईड'ची खास वैशिष्ट्ये

एसटी महामंडळाचा पुढाकार: ही सेवा एसटी महामंडळामार्फत चालवली जाईल, ज्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात भर पडेल.

कमी दरात प्रवास: खाजगी कंपन्यांच्या 'सर्ज प्रायसिंग'ला पर्याय म्हणून परवडणारे दर असतील.

सुरक्षितता: सरकारी देखरेखीखाली असल्याने प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.

मराठी तरुणांना रोजगार: या सेवेमुळे राज्यातील हजारो तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

45
कधीपासून होणार सुरुवात?
Image Credit : our own

कधीपासून होणार सुरुवात?

या प्रकल्पासाठी नेमलेल्या विशेष समितीचा अहवाल याच महिन्याअखेर सादर होईल. त्यानंतर मार्च किंवा एप्रिल २०२६ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही सेवा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवण्याची तयारी सुरू आहे. 

55
प्रवाशांचा होणार फायदा
Image Credit : Freepic

प्रवाशांचा होणार फायदा

आता मुंबईकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला ओला-उबर व्यतिरिक्त एक विश्वासार्ह 'आपला' पर्याय मिळणार आहे. यामुळे बाजारातील मक्तेदारी संपून स्पर्धा वाढेल आणि पर्यायाने प्रवाशांचा फायदा होईल.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Recommended image2
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट
Recommended image3
Delhi Protest : दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले- 'ही तर अघोषित आणीबाणी!'
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Related Stories
Recommended image1
Mumbai Water Cut Alert: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' भागांत ३० तास पाणी कापला जाणार; पाहा कुठे आणि कधी होणार पाणीबाणी?
Recommended image2
Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबईकरांची लोकल ‘स्लो’, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वेळ आणि ठिकाणं जाणून घ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved