MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • ठाणे स्थानकाचा कायापालट! आता मुसळधार पावसातही लोकल धावणार सुसाट; रेल्वेचा 'गेमचेंजर' प्रकल्प फत्ते

ठाणे स्थानकाचा कायापालट! आता मुसळधार पावसातही लोकल धावणार सुसाट; रेल्वेचा 'गेमचेंजर' प्रकल्प फत्ते

Thane Station Waterlogging Solution: ठाणे स्थानकात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर मध्य रेल्वेने मायक्रोटनेलिंग प्रकल्पाद्वारे तोडगा काढला. या बोगद्यामुळे पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होणार असून मुसळधार पावसातही लोकल सेवा विस्कळीत होणार नाही. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 10 2026, 06:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
ठाणे स्थानकाचा कायापालट! आता मुसळधार पावसातही लोकल धावणार सुसाट
Image Credit : Social media

ठाणे स्थानकाचा कायापालट! आता मुसळधार पावसातही लोकल धावणार सुसाट

ठाणे : दरवर्षी पावसाळा आला की मुंबईकरांच्या उरात धडकी भरते ती म्हणजे 'लोकल ठप्प' होण्याची. त्यातही ठाणे स्थानकातील पाणी साचण्याच्या समस्येमुळे कर्जत, कसारा आणि पनवेलला जाणाऱ्या लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल व्हायचे. मात्र, आता ही चिंता कायमची मिटणार आहे. मध्य रेल्वेने ठाणे स्थानकात एक 'हायटेक गेमचेंजर' प्रकल्प राबवला असून, यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली जाण्याचे टेन्शन आता प्रवाशांना राहणार नाही. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
काय आहे हा प्रकल्प?
Image Credit : X(Twitter)

काय आहे हा प्रकल्प?

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १ ते १० च्या खालून मध्य रेल्वेने 'मायक्रोटनेलिंग'चे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हे महामुंबईतील सर्वात लांबीचे मायक्रोटनेल ठरले असून, या अत्याधुनिक बोगद्यामुळे आता पावसाच्या पाण्याचा निचरा सेकंदात होणार आहे. 

Related Articles

Related image1
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तब्बल 6 महिन्यांनंतर मोनोरेल पुन्हा धावणार; कधी होणार सुरुवात?
Related image2
Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास आता 'बुलेट' वेगाने! लोकलचं रूप पालटणार; येत आहे 'वंदे मेट्रो' AC लोकल, पाहा काय आहेत फीचर्स
34
प्रवाशांना दिलासा देणारी 'बटन प्रणाली'
Image Credit : our own

प्रवाशांना दिलासा देणारी 'बटन प्रणाली'

पाण्याचा वेगवान निचरा: ठाणे पश्चिमेकडून येणारे पावसाचे पाणी आता थेट पूर्वेकडे वळवले जाईल.

स्मार्ट सिस्टीम: या टनेलसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असून, केवळ एक बटण दाबताच साचलेल्या पाण्याचा निचरा सुरू होईल.

विक्रमी वेळेत पूर्ण: १ डिसेंबर २०२४ ला सुरू झालेले हे काम अवघ्या दीड महिन्यात म्हणजेच १५ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण करण्यात आले. 

44
खडतर प्रवास, पण यशस्वी टप्पा
Image Credit : SOCIAL MEDIA

खडतर प्रवास, पण यशस्वी टप्पा

ठाणे स्थानकाखालील कठीण खडक आणि चिकणमातीमुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, रेल्वेने लेझर तंत्रज्ञान, हायड्रोलिक जॅक आणि अत्याधुनिक बोरिंग मशिनचा वापर करून हे आव्हान पेलले आहे. यामुळे फलाट १, २ आणि ३ वर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार आता इतिहासजमा होणार आहेत. या प्रकल्पामुळे ठाणेकरांसह कर्जत-कसारा आणि पनवेलच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मध्य रेल्वेने पावसाळ्यापूर्वीच प्रवाशांना ही मोठी 'गुड न्यूज' दिली आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Recommended image2
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट
Recommended image3
Delhi Protest : दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले- 'ही तर अघोषित आणीबाणी!'
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Related Stories
Recommended image1
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तब्बल 6 महिन्यांनंतर मोनोरेल पुन्हा धावणार; कधी होणार सुरुवात?
Recommended image2
Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास आता 'बुलेट' वेगाने! लोकलचं रूप पालटणार; येत आहे 'वंदे मेट्रो' AC लोकल, पाहा काय आहेत फीचर्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved