MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास आता 'बुलेट' वेगाने! लोकलचं रूप पालटणार; येत आहे 'वंदे मेट्रो' AC लोकल, पाहा काय आहेत फीचर्स

Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास आता 'बुलेट' वेगाने! लोकलचं रूप पालटणार; येत आहे 'वंदे मेट्रो' AC लोकल, पाहा काय आहेत फीचर्स

Mumbai Local News: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनचा मेक इन इंडिया अंतर्गत कायापालट होणार असून लवकरच वंदे मेट्रो एसी लोकल रुळांवर धावणार आहे. ही लोकल ताशी १३० किलोमीटर वेगाने धावून प्रवाशांचा वेळ वाचवेल आणि प्रवास आरामदायी व सुरक्षित करेल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 08 2026, 04:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईकरांचा प्रवास आता 'बुलेट' वेगाने! लोकलचं रूप पालटणार
Image Credit : Social media

मुंबईकरांचा प्रवास आता 'बुलेट' वेगाने! लोकलचं रूप पालटणार

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनचा आता पूर्णपणे कायापालट होणार आहे. रोजच्या धावपळीच्या प्रवासात घाम गाळणाऱ्या मुंबईकरांसाठी रेल्वेने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत आता मुंबईच्या रुळांवर अत्याधुनिक 'वंदे मेट्रो' (Vande Metro) एसी लोकल धावणार आहे. ही ट्रेन केवळ आरामदायीच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही जागतिक दर्जाची असणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रवासाचा वेग वाढणार, वेळ वाचणार!
Image Credit : X(Twitter)

प्रवासाचा वेग वाढणार, वेळ वाचणार!

वंदे मेट्रो लोकलची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचा वेग. ही लोकल ताशी १३० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. यामुळे उपनगरातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच, १८ डब्यांच्या या भव्य ट्रेनमुळे प्रवासी वहनक्षमता वाढून गर्दीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
MHADA Pune Lottery: पुणेकरांनो, गुलाल उधळायला तयार राहा! म्हाडाच्या घरांची लॉटरी 'या' तारखेला; २ लाख १५ हजार अर्जदारांची प्रतीक्षा संपली!
Related image2
Chhava Ride Government Taxi App: ओला-उबरला रामराम! महाराष्ट्रात येतंय हक्काचं 'सरकारी' ॲप; आता प्रवास होणार स्वस्त!
35
विमानासारख्या सुविधा आता लोकलमध्ये
Image Credit : Getty

विमानासारख्या सुविधा आता लोकलमध्ये

वंदे मेट्रोमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी हायटेक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.

धक्केमुक्त प्रवास: एअर-स्प्रिंग सेकंडरी सस्पेन्शन प्रणालीमुळे गाडी कितीही वेगात असली तरी प्रवाशांना धक्के जाणवणार नाहीत.

चार्जिंग आणि इन्फोटेनमेंट: प्रवाशांसाठी डब्यात यूएसबी चार्जिंग पॉइंट्स आणि प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी इन्फोटेनमेंट स्क्रीन असतील.

लाईव्ह मॅप: प्रवाशांना स्टेशनची माहिती देण्यासाठी रिअल-टाइम लोकेशन दाखवणारे नकाशे (Digital Maps) असतील.

मोकळी जागा: यंत्रणा डब्याच्या छत आणि तळभागावर बसवल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी अधिक जागा मिळेल. 

45
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
Image Credit : Getty

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी या गाडीत स्वयंचलित दरवाजे (Automatic Doors) असतील. तसेच, दिव्यांग प्रवाशांसाठी आणि व्हीलचेअरसाठी स्वतंत्र जागेची तरतूद करण्यात आली आहे. गादीयुक्त आसनांमुळे प्रवाशांचा लांबचा प्रवासही सुखाचा होणार आहे.

55
मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा (MRVC) विश्वास
Image Credit : Getty

मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा (MRVC) विश्वास

"वंदे मेट्रोमुळे मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा जागतिक दर्जाची होईल. मुंबईकरांचा प्रवास केवळ वेगवान नाही, तर गारेगार आणि सुरक्षित होईल."

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Recommended image2
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट
Recommended image3
Delhi Protest : दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले- 'ही तर अघोषित आणीबाणी!'
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Related Stories
Recommended image1
MHADA Pune Lottery: पुणेकरांनो, गुलाल उधळायला तयार राहा! म्हाडाच्या घरांची लॉटरी 'या' तारखेला; २ लाख १५ हजार अर्जदारांची प्रतीक्षा संपली!
Recommended image2
Chhava Ride Government Taxi App: ओला-उबरला रामराम! महाराष्ट्रात येतंय हक्काचं 'सरकारी' ॲप; आता प्रवास होणार स्वस्त!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved