Weather Update : उष्णतेची लाट आणि रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा...जाणून घ्या मुंबईतील तापमानाची स्थिती

| Published : Apr 30 2024, 09:35 AM IST / Updated: Apr 30 2024, 09:38 AM IST

heat

सार

Mumbai Weather : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना हैराण केले आहे. शहरातील तापमान 39.1 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात उन्हाळ्यातील तापमानाचा रेकॉर्ड ब्रेकही झाला आहे. 

Mumbai Weather Update : मुंबईत सोमवारी (29 एप्रिल) उकाड्याने नागरिकांना पुन्हा हैराण करत तापमान 39.1 अंश सेल्सिअवर पोहोचले गेले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 1952 नंतर एप्रिल महिन्यात सर्वाधिक तिसऱ्यांदा उन्हाळ्यातील तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात 26 एप्रिल पर्यंत 184 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतही गेल्या दोन दिवसापासून उन्हाच्या झळा जाणवत आहेत. कुलाबा येथे सोमवारी अधिकाधिक तापमान 35.2 अंश सेल्सिअस असल्याचे नोंदवण्यात आले. याआधी वर्ष 2022 मधील तापमान 37.2 डिग्री सेल्सिअस असल्याची नोंद करण्यात आली होती.

हवामान विभागाचा मुंबईतील तापमानाचा अंदाज
हवामान विभागाचे विशेतज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी म्हटले की, मुंबईला तिन्ही बाजूने समुद्राने वेढले आहे. यामुळे वाऱ्याच्या प्रभावामुळे तापमान वाढले जात नाही. पण उपनगरातील स्थिती वेगळी आहे. सध्या मुंबईत कडाक्याच्या उन्हाची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय हवामान खात्याच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी म्हटले की, उष्णतेची लाट कमी होईल. पुढील काही दिवसात मुंबईतील तापमानाचा चढलेला पारा कमी होताना दिसेल.

वर्ष 1952 नंतर मुंबईत एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद
हवामान खात्यानुसार, 14 एप्रिल, 1952 रोजी सांताक्रुज वेधशाळेत आतापर्यंतच्या सर्वाधिक तपमानाची नोंद करण्यात आली आहे. वर्ष 1952 रोजी तापमानाचा पारा 42.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला गेला होता. यानंतर वेबसाइटवर गेल्या 10 वर्षातील तापमानाची आकडेवारी पाहिली असता यंदाच्या वर्षात 16 एप्रिलला तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याचे दिसून आले. यानंतर 29 एप्रिलला 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

आणखी वाचा : 

मुंबईतील उष्माघाताचा मुलांना त्रास, जुलाब आणि उलट्यांच्या समस्यांमध्ये वाढ

दुकान आणि संस्थांवर मराठी बोर्ड नसल्यास Property Tax दुप्पट होणार, महापालिकेचा मोठा निर्णय