मुंबईकरांसाठी गुड न्यूज, 11 जुलै पासून कोस्टल रोडचा तिसरा फेज खुला केल्याने 7 मिनिटांत पूर्ण होणार 10 किमीचा प्रवास

| Published : Jul 11 2024, 10:01 AM IST

Mumbai Coastal Road
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, 11 जुलै पासून कोस्टल रोडचा तिसरा फेज खुला केल्याने 7 मिनिटांत पूर्ण होणार 10 किमीचा प्रवास
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मुंबईट्या समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने वेगवेगळ्या टप्प्यात वाहतूकीच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोस्टल रोडचा तिसरा फेज 11 जुलैपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

Mumbai Coastal Road Phase-3 : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी असून 11 जुलैपासून मुंबई कोस्टल रोडचा तिसरा फेज सुरु करण्यात आला आहे. तिसरा फेज सकाळी 7 वाजल्यापासून वाहतुकीसाठी सुरु केला आहे. यामुळे मरिन लाइन्स ते वरळी सी-लिंकपर्यंत थेट नॉन-स्टॉप प्रवास नागरिकांना अवघ्या 7 मिनिटांमध्ये करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मरिन लाइन्स ते हाजीअलीपर्यंतचा मार्ग सुरु करण्यात आला होता. तर पहिल्या टप्प्यात बिंदु माधव चौक वरळी ते मरीन लाइन्सपर्यंतचा मार्ग प्रवाशांसाठी सुरु करण्यात आला होता.

तिसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर आता सुरु केल्याने नागरिकांना कोस्टर रोड सबवेच्या माध्यमातून मरिन लाइन्स येथून वरळी सी फेस स्कूल म्हणजेच अब्दुल गफ्फार खान मार्गापर्यंत थेट प्रवास करता येणार आहे. अखरेच्या चौथ्या टप्प्यात आणि चौथ्या टप्प्यात दोन कोस्टल रोड आणि वरळी सी-लिंकला जोडण्याचे काम केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी
10 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या तिसऱ्या फेजची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी मुख्यमंत्र्यांना कोस्टल रोडच्या प्रगती कार्याची माहिती दिली. सूत्रांनुसार, मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला स्पष्ट निर्देशन दिले आहेत की, कोस्टल रोड सुरु झाल्यानंतर वाहन चालकांना कोणत्याही प्रकारची समस्या होऊ देऊ नये.

चौथ्या फेजमुळे असा होणार फायदा
काही दिवसांपूर्वी चौथ्या फेजसाठी दोन गर्डर लावण्यात आले होते. सध्या गर्डरपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता तयार केला जात आहे. चौथा फेज तीन आठवड्यांमध्ये पूर्ण झाल्यानंतर मरीन लाइन्स येथून वांद्रे आणि वांद्रे येथून मरीन लाइन्सपर्यंतचा थेट प्रवास करता येणार आहे.

जून महिन्यात दुसऱ्या फेजचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी 10 जूनला कोस्टल रोडच्या दुसऱ्या फेजचे उद्घाटन केले होते. यानंतर 11 जूनपासून दुसरा फेज वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता. मुख्यमंत्री एक शिंदे यांनी गेल्या महिन्यातील उद्घाटनानंतर म्हटले होते की, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा दुसरा फेज सुरु करण्यात आला आहे. हा कोस्टल रोड हाजी अली आणि अमरसन्सपासून 6.25 किलोमीटरवर विस्तारलेला आहे.

आणखी वाचा : 

मुंबईत CNG च्या दरात वाढ झाल्याने टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता, प्रवाशांच्या खिशाला बसणार फटका

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती