मुंबईत CNG च्या दरात वाढ झाल्याने टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता, प्रवाशांच्या खिशाला बसणार फटका

| Published : Jul 11 2024, 08:51 AM IST / Updated: Jul 11 2024, 08:54 AM IST

Mumbai taxi

सार

Mumbai CNG Price Hike : मुंबईत सीएनजीचे दर दीड रुपयांनी वाढले आहे. करण्यात आली आहे. अशातच आता मुंबईत टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनाच्या वाढलेल्या किंमती 8 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आल्या आहेत.

Mumbai Taxi Fare : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सीनएजीच्या दर वाढीला लगाम लागला होता. केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने मुंबईतील सीनएजी आणि पीनएजीच्या दरात वाढ केली केली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो दीड रुपयांनी वाढ केल्याने ऑटो रिक्षा युनियनकडून भाडे वाढ करण्यात आली आहे. यामुळेच टॅक्सी चालकही आपल्या भाड्यात वाढ करण्याची शक्यता आहे.

ऑटो रिक्षा चालकांची अशी मागणी आहे की, सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढल्यानंर भाडे 23 रुपयांएवजी 25 रुपये करावे. याशिवाय प्रति किमी रनिंग भाडे 15.33 रुपयांएवजी 16.99 रुपये करण्यात यावे. खरंतर, कंज्युमर प्राइस इंडेक्सच्या हिशोबाने प्रति किलोमीटरचे भाडे वाढीसंदर्भात निर्णय घेतला जातो. यामध्ये वाहनासाठी आलेला खर्च, देखरेख, टॅक्स आणि इन्शुरन्सवर किती खर्च होत आहे या गोष्टी देखील पाहिल्या जातात.

युनियनचे काय म्हणणे?
ऑटो रिक्षा युनियन नेते थंपी कुरियन यांच्यानुसार, सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने चालकांना दररोज 150 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे कंज्युमर प्राइस इंडेक्समध्येही वाढ होत आहे. टॅक्सी युनियन देखील सर्वसामान्य भाडे 28 रुपयांवरुन 30 रुपयांपर्यंत करू पाहत आहे. पण अन्य सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतरच भाडे वाढीसंदर्भातील निर्णय घेतला जाईल असेही थंपी कुरियन यांनी म्हटले आहे. ऑटो आणि टॅक्सी युनियनने भाडे वाढीसंदर्भातील निर्णय घेतल्यानंतर तो वाहतूक विभागाकडे पाठवला जाईल.

दोन वर्षांआधी झाली होती भाडेवाढ
MMRTA द्वारे ऑक्टोंबर, 2022 मध्ये भाडे वाढ करण्यात आली होती. ऑटोसाठी 2 रुपये आणि टॅक्सीचे सर्वसामान्य भाडे 3 रुपयांनी वाढवण्यात आले होते. एमजीएलने 8 जुलैला CNG च्या दरात दीड रुपयांनी वाढ केली आङे. अशातच मुंबईत सीएनजीचे दर 75 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हायब्रिड अथवा सीएनजी वाहनांची मागणी वाढली आहे.

मुंबईतील महानगरांमध्ये जवळजवळ 10 लाख सीएनजी वाहनांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. यामध्ये 40 लाख रिक्षा, 50 लाख खासगी वाहने, 2400 बस आणि 70 हजार टॅक्सींचा समावेश आहे.

आणखी वाचा : 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अंधेरी सब-वे, हिंदमाता पुन्हा पाण्याखाली, पाणी न साचण्यासाठी बीएमसी करणार प्रयत्न