'मला वाटले स्पीडबोटचा स्टंट', प्रत्यक्षदर्शींनी सांगितली भयावय स्थिती

| Published : Dec 19 2024, 11:34 AM IST / Updated: Dec 19 2024, 11:49 AM IST

Speed Boat Accident

सार

गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अशातच दुर्घटना नेमकी कशी घडली याबद्दलच्या स्थितीची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Mumbai boat accident : मुंबईतील एलिफंटा येथे जाणाऱ्या एका बोटीचा अपघात झाल्याची दुर्घटना 18 डिसेंबरला घडली गेली. या दुर्घटनेत काहीजण जखमी झाले तर 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय अद्याप काहीजण बेपत्ता झाले आहेत. बोटीच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या काहींनी म्हटले की, अपघातानंतर कोणतीही आपत्कालीन तयारी करण्यात आलेली नव्हती. व्यक्तींना स्वत:हून लाइव्ह जॅकेट शोधावे लागले होते. दुर्घटनेतील जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ गौतम गुप्ता नावाचा एका प्रवाशाने तयार केला होता. याबद्दलचा भयावय किस्सा गौतम याने सांगितला आहे.

प्रत्यक्षदर्शींने सांगितला अनुभव

गौमत गुप्ताने घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना म्हटले की, मी स्पीडबोटचा व्हिडीओ काढत होते. यावेळी प्रथमदर्शी वाटले की, स्पीडबोट स्टंट करता. पण अचानक स्पीडबोट जहाजाला धडकली गेली. धडक जोरात बसत त्यामधील प्रवाशी हवेत उडून बोटच्या डेकवर पडले गेले. हे सर्व पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. स्पीडबोटमधील एक प्रवासी माझ्या बाजूला पडला होता. त्याला खूप दुखापत झाली होती.

 

 

मावशीही अद्याप बेपत्ता

गौतमला त्याच्या चुलत भाऊ रिंता गुप्तासोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याशिवाय गौतमची मावशी अद्याप बेपत्ता आहे. गौमतने म्हटले की, मावशी आणि तिच्या मुलीसोबत एलिफंटाला जात होतो. खरंतर, मावशी मुलीला घेऊन मुंबईत फिरण्यासाठी आली होती. बुधवारी अशी दुर्घटना घडली गेली. सध्या गौतम आणि त्याचा चुलत भाऊ याची प्रकृती स्थिर आहे.

प्रवाशांनी स्वत:हून शोधले लाइव्ह जॅकेट्स

41 वर्षीय राम मिलन सिंहने आपल्या दोन मित्रांसोबत मुंबईत राहणाऱ्या मेहुण्यासोबत बंगळुरुहून आला होता. ते देखील एलिफंटाला जात होते. बोटीची दुर्घटना घडली असता तातडीने सर्वांनी लाइव्ह जॅकेट घातले आणि बुडण्यापूर्वी पाण्यात उड्या मारल्या. सिंह यांनी म्हटले की, मेव्हण्याला वाचवण्यात आले असून दोन मित्रांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अखेरचे त्यांना लाइव्ह जॅकेट घालून तरंगताना पाहिले होते.

पाण्यात उड्या मारण्याचा निर्णय

सिंह यांनी पुढे म्हटले की, बोटीत पाणी येऊ लागले होते. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत बोटीमधील सर्वजण डेकच्या दिशेने पळू लागले. यानंतर बोट एका बाजूला झुकली गेले. वरच्या डेकवर फार गर्दी झाली असता काहीजण पाण्यात बुडाले गेले. आम्ही अर्धा तास समुद्रात होते असेही सिंह यांनी म्हटले.

पोहत काहीजण गेले...

सिंह यांनी म्हटले की, "सुरुवातीला स्पीडबोट दूर होती. ती फिरत होती आणि काहीजण व्हिडीओ काढत होते. नंतर अचानक स्पीडबोट अचानक जहाजाला धडकली गेली." कुरल येथे राहणारे नथाराम चौधरी देखील याच फेरीमध्ये होते. ते आपल्या मित्रासोबत प्रवास करत होते. चौधरी यांनी म्हटले की, "आम्ही पोहत काही अंतरावर गेलो. यानंतर एका दुसऱ्या बोटीने आम्हाला वाचवले. फेरीमध्ये असणाऱ्या काहीजणांकडून स्पीडबोटचे व्हिडीओ देखील काढले गेले. पण त्यांना पुढे काय होणार हे माहिती देखील नव्हते."

आणखी वाचा : 

Gate Way Boat Accident : पीडितांना मिळणार 2 लाखांची मदत, वाचा आतापर्यंत काय घडले

मुंबईत एलिफंटा परिसरातील बोट दुर्घटनेत 3 ठार तर 8 बेपत्ता, बचावकार्य सुरू