सार
गेटवे वरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात घडल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या या दुर्घटनेत बोट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gate Way Boat Accident Updates : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात बोट बुडाल्याची दुर्घटना 18 डिसेंबरला घडली. या दुर्घटनेत 13 जणांना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये सात पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. बोटीमधील पर्यटकांना गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटा येथे नेण्यात येत होते.
काय घडले?
गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या बोटीची जहाजाला धडक बसली गेली. दुर्घटनेनंतर बोटीमधील सर्वजण आक्रोश करू लागले. बोट उलटी झाल्याने समुद्रात बुडालेल्या व्यक्तींचे तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यामध्ये जवळजवळ 101 व्यक्तींना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. पण 13 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आतापर्यंत काय घडले...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय मृत व्यक्तींच्या परिवाराला 2 लाखांची आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणाही केली आहे. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेटवे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
- नौसेनाने आपल्या विधानात म्हटले की, इंजिन परिक्षणाच्या स्थितीतून जाणाऱ्या नौसेनेच्या एका जहाजाने नियंत्रण गमावले आणि मुंबईतील करंजाजवळील प्रवासी बोट नील कमलला धडक दिली.
- असे देखील सांगितले जात आहे की, नौसेनाच्या स्पीड बोट चालक आणि दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अन्य व्यक्तींच्या विरोधात दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
- मुंबईतील साकीनाका येथे राहणारे नाथाराम चौधरी यांच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआर अंतर्गत म्हटले आहे की, बेजबाबदारपणामुळे मृत्यू, एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी न घेता केले गेलेले कृत्य, घाईघाईत वाहन चालवणे किंवा बेजबाबदारपणे बोट चालवण्याचे कार्य अशा काही गोष्टींचा उल्लेख केला आहे.
- पोलिसांनी म्हटले की, आतापर्यंत दहा मृतांची ओखळ पटली आहे. यामध्ये अद्याप दोन महिला आणि एका पुरुषाची ओखळ पटलेली नाही.
- मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरील एक नौका आणि नौसेनेच्या जहाजामध्ये झालेल्या धडकेची दुर्घटना आजवर कधीच पाहिलेली नाही अशी प्रतिक्रिया दुर्घटना स्थळी प्रथम पोहोचलेल्या व्यक्तींनी दिली आहे.
- मुंबई पोर्ट ट्रस्टचे पायलट बोट पूर्वाचे ड्रायव्हर आरिफ बामणे यांनी म्हटले की, बोटीवरील सर्वजण आक्रोश करत होते तर काहीजण रडत होते. ज्यावेळी आम्ही तेथे पोहोचले तेव्हा स्थिती अत्यंत भयावह होती.
- पत्रकारांसोबत बाचतीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बेपत्ता झालेल्या व्यक्तींबद्दल लवकरच कळले जाईल. दुर्घटनेतील पीडितांच्या परिवाराला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. याशिवाय संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आणि नौसेनेकडून तपास केला जाईल.
आणखी वाचा :
मुंबईतील नीलकमल बोट अपघात: १३ जणांचा मृत्यू, बोट मालकावर गुन्हा दाखल होणार
मुंबईहून एलिफंटाला जाणारी बोट बुडाली; कसा झाला अपघात? व्हिडीओ!