बोरिवलीत पतंगीच्या मांजाने घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

| Published : Jan 16 2024, 12:11 PM IST / Updated: Jan 16 2024, 12:15 PM IST

death

सार

बाइकवरुन जाताना पतंगीच्या मांजाने गळा कापल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवलीत घडली आहे. तरुण धारावी येथे राहणारा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Borivali :  सोमवारी (15 जानेवारी) देशभरात मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण मोठ्या उत्साहात सादरा केला गेला. यावेळी पतंगबाजीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. पण बोरिवलीतील परिसरात पतंगीच्या मांजामुळे 21 वर्षीय तरुणाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. खरंतर तरुण बाइकवरुन जात असताना त्याच्या गळ्याला पतंगीचा मांजा लागून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

बोरिवली पोलिसांनी या घटनेबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, फारूक असे मृत तरुणाचे नाव आहे. फारूक आपला मित्र हमीद अनीस अहमद याच्यासोबत एसी दुरुस्तीच्या कामासाठी चारकोपला गेला होता. चारकोपवरुन परत येताना फारूक बाइक चालवत होता आणि हमीद मागे बसला होता. फारूक वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सुमेर नगर फ्लायओव्हर ब्रिजवर पोहोचला असता त्याच्या गळ्याला पतंगीचा मांजा अडकला गेला.

Mid-Dayशी बोलताना हमीदने म्हटले की, सुरुवातीला नक्की काय घडले कळले नाही. बाइकचा वेग 50 किमी प्रति तास होता आणि अचानक फारूचे बाइकवरील नियंत्रण सुटले असता आम्ही दोघे पुलावर पडलो. यावेळी फारूकच्या गळ्याला मांजा अडकल्याने रक्त वाहत होते. अशातच फारूकला शताब्दी रुग्णालयात नेले असता तो मृत्यूच्या 15 मिनिट आधी जीवंत होता असेही हमीदने सांगितले.

धारावीत राहणारा होता फारूक
फारूक मूळचा अलाहाबादमधील लालगंज परिसरात राहणारा होता. सध्या फारूक धारावीत आपल्या मामासोबत एसी मॅकेनिकच्या रुपात काम करत होता. दहावीत शिकणारा हमीद एका नातेवाईकांच्या लग्नासाठी मुंबईत आला होता. हमीदने फारूकच्या परिवाराला त्याच्या मृत्यूबद्दल कळवले आहे.

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल
बोरिवली पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस वरिष्ठ निरीक्षक निनांद सावंत यांनी म्हटले की, आम्ही अज्ञात व्यक्तीचा शोधत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला कस्तुरबा मार्ग पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली होती. नंतर प्रकरण बोरिवली पोलिसांकडे सोपवण्यात आले.

पतंगीच्या मांजामुळे एकाच महिन्याच्या आत दुसरा मृत्यू
या घटनेच्या एका महिन्याच्या आत मुंबईत पतंगीच्या मांजाने गळा कापल्याने मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 25 डिसेंबरला (2023) दिंडोशी पोलिसांच्या एका पोलीस हवालदार यांनी सांताक्रुझ पूर्वेला असणाऱ्या वाकोला उड्डाणपुलावर आपला जीव गमावला होता. यावेळी पतंगीचा मांजा हवालदार यांच्या गळ्याला लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा : 

Parel Bridge Accident : मुंबईतील परळ पुलावर मोटरसायकल आणि डंपरमध्ये जोरदार धडक, अपघातात तिघांचा मृत्यू

Mumbai : शहरात काही ठिकाणी स्फोट होतील...धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस अ‍ॅलर्ट मोडवर

Mumbai : RBIसह अन्य ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई