सार

मुंबईत काही ठिकाणी स्फोट होतील असा फोन मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अ‍ॅलर्ट झाल्या असून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. 

Mumbai Police Threat Call : मुंबईत काही ठिकाणी स्फोट होतील अशा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आल्याचे वृत्त समोर येत आहे. यानंतर पोलीस यंत्रणा अ‍ॅलर्ट मोडवर आली असून या प्रकरणात अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन करत अज्ञात व्यक्तीने शहरातील काही ठिकाणी स्फोट होतील असे म्हटले. फोनवर स्फोटाची धमकी दिल्यानंतर व्यक्तीने फोन ठेवला. यानंतर आता खळबळ उडाली असून शहरात ठिकठिकाणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना शनिवारी (30 डिसेंबर, 2023) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यावेळी फोनवरील अज्ञात व्यक्तीने शहरात काही ठिकाणी स्फोट होतील म्हणत फोन ठेवला. यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही यामध्ये अटक करण्यात आलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, धमकीचा फोन कोणी केला याबद्दल कळलेले नाही. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न 
मुंबईसह आज देशभरात नववर्षाचे सेलिब्रेशन केले जाणार आहे. याआधीच धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणा अ‍ॅलर्ट झाली असून ठिकठिकाणी या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.

दिल्लीत देखील पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. याशिवाय नोएडामध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याची तयारी केली आहे.

आणखी वाचा: 

Mumbai : RBIसह अन्य ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai New Year Special Local : नववर्षाच्या मध्यरात्री मुंबईत चालवल्या जाणार स्पेशल लोकल ट्रेन, पाहा वेळापत्रक

Section 144 : मुंबईत येत्या 18 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू, या गोष्टींसाठी असणार बंदी