Deep Clean Campaign : स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरू ठेवा, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश
- FB
- TW
- Linkdin
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील कुलाबा आणि पूर्व मुक्त मार्ग परिसरात शनिवारी (6 जानेवारी 2024) स्वच्छता मोहीम राबवली. “स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानासही प्रारंभ झाल्याचे सांगत स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरू ठेवा”, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी 3 डिसेंबर 2023 पासून शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. सलग पाच आठवड्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मोहीमेत सहभागी होत आहेत.
शनिवारी (6 जानेवारी 2024) कुलाबा परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
कुलाबा परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
रस्त्यावर माती - कचरा दिसणार नाही, साचलेल्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याविषयी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचनाही दिल्या.
संपूर्ण स्वच्छता अभियान
🗓️ 06-01-2024📍आयएनएस शिखरा, कुलाबा, मुंबई https://t.co/iXab3VQUik— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 6, 2024
यावेळेस त्यांनी परिसरात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
“डीप क्लिनिंग मोहीम केवळ मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभरात राबवण्यात आली आहे. मोहीम नियमित सुरू असल्याने वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे”, असेही यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले.
संपूर्ण स्वच्छता अभियान
🗓️ 06-01-2024📍फ्री-वे, मुंबई
https://t.co/dEKXCDZV0k— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 6, 2024
पूर्व मुक्त मार्ग परिसरातील वाहतूक पोलीस चौकी येथेही संपूर्ण स्वच्छा मोहीम राबवण्यात आली.
तसेच स्वच्छता करणाऱ्या खऱ्या हीरोंकडे शासनाचे लक्ष राहील. त्यांच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
संपूर्ण स्वच्छता अभियान
🗓️ 06-01-2024📍एमटीएचएल इंटरचेंज, फ्री-वे, मुंबई
https://t.co/V3989bJpCy— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 6, 2024
आणखी वाचा :
Mumbai Trans Harbour Link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची केली पाहणी
ऑन ड्युटी असलेल्या पोलिसाच्या कानशिलात लगावली, भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात गुन्हा दाखल