सार

BJP MLA Sunil Kamble : पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

BJP MLA Sunil Kamble : ऑन ड्युटी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुनील कांबळेंविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भर कार्यक्रमात नेमके काय घडले?

पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील 11 मजली नव्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी (5 जानेवारी 2024) पार पडलेल्या या क्रार्यक्रमात भाजप आमदार सुनील कांबळे यांनीही हजेरी लावली होती.

यावेळेस स्टेजवरून खाली उतरताना कांबळे यांचा पाय अडखळला. तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढे आले. पण त्यांचे आभार मानण्याऐवजी कांबळेंनी पोलिसाच्याच कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

विरोधकांकडूनही आमदार सुनील कांबळेंवर जोरदार टीका करण्यात येत असून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणी केल्याप्रकरणी निषेधही व्यक्त केला जात आहे.  

 

आमदार सुनील कांबळे यांचे स्पष्टीकरण

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वादात अडकल्यानंतर भाजप आमदार यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, "स्टेजवरून खाली उतरताना माझ्या समोर ती व्यक्ती आली. त्याला ढकलले आणि पुढे निघून आलो. मारहाण करण्यासाठी तो काय माझ्या ओळखीचा आहे की माझे त्याच्याशी वैर आहे? असा कोणताही प्रकार नाही".

आणखी वाचा :

AEIFF : Animal सारखा सिनेमा सुपर-डुपर हिट होणे ही बाब चिंताजनक, जावेद अख्तर यांचे परखड मत

Watch Video: भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना शिकवला धडा, सुरक्षितरित्या हायजॅक झालेल्या जहाजाची केली सुटका

पत्नीची हत्या करून पतीची मेट्रो स्टेशनवर आत्महत्या, एक वर्षाचा मुलगा आईच्या मृतदेहाजवळ होता रडत