MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!

मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!

Targhar Railway Station Opening Date : नवी मुंबईतील नेरूळ-बेलापूर मार्गावर तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन रेल्वे स्थानके लवकरच सुरू होणार आहेत. ठाणे रेल्वे प्रशासनाने या स्थानकांना मंजुरी दिली असून, निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर लोकल सेवा सुरू होईल.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Dec 06 2025, 04:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
तरघर आणि गव्हाण रेल्वे स्थानक लवकरच सुरू होणार
Image Credit : Social media

तरघर आणि गव्हाण रेल्वे स्थानक लवकरच सुरू होणार

Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या गर्दीसाठी प्रशासन वेळोवेळी उपाययोजना करत असले तरी, आता नवी मुंबई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे—नेरूळ-बेलापूर मार्गावर दोन नवीन रेल्वे स्थानक सुरू होणार आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय माहिती मिळाली आहे?
Image Credit : X(Twitter)

काय माहिती मिळाली आहे?

ठाणे रेल्वे प्रशासनाने सांगितले की तरघर आणि गव्हाण ही नवी स्थानके अधिकृतपणे मंजूर झाली आहेत. मात्र, प्रत्यक्ष लोकल सेवा सुरू करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी लवकरच आयोगाकडे पाठवली जाणार आहे. 

Related Articles

Related image1
Financial Planning : महिलांनी चुकूनही घेऊ नका या ३ प्रकारचे कर्ज, वाचा कारण
Related image2
कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
35
का आहेत ही नवीन स्थानके महत्वाची?
Image Credit : Getty

का आहेत ही नवीन स्थानके महत्वाची?

उरण, जासई आणि उलवे या भागातून नेरूळ-बेलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सकाळी आणि संध्याकाळी लोकल फेऱ्या अंतराळावर चालत असल्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत होती.

नवीन स्थानकांमुळे प्रवाशांना सोयीस्कर थांबा आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यास मदत होणार आहे.

विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क सुधारण्यासाठी ही लोकल सेवा महत्त्वाची ठरेल. 

45
सध्याची सेवा
Image Credit : Getty

सध्याची सेवा

सध्याच्या मार्गावर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:55 पर्यंत एकूण 40 फेऱ्या चालतात. मात्र, प्रवाशांना सकाळी आणि संध्याकाळी लोकल साधारण एक ते दीड तासाच्या अंतराने उपलब्ध होत असल्यामुळे गर्दी वाढते. 

55
कधीपासून सुरू होईल?
Image Credit : Getty

कधीपासून सुरू होईल?

तरघर आणि गव्हाण ही दोन्ही स्थानके पूर्ण झाली आहेत. निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर लवकरच लोकल थांबा सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईच्या प्रवाशांसाठी ही नवीन सेवा निश्चितच प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवणार आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Finnish Family In Mumbai: 'आम्ही खूप नशीबवान आहोत': मुंबईत राहणाऱ्या फिनलंडच्या कुटुंबाला भारतातील 'या' १० गोष्टींचे वाटते आश्चर्य
Recommended image2
Mumbai BMC Threat : मुंबई महापालिकेला धमकीचा ईमेल, पोलिसांकडून अधिक तपास
Recommended image3
Viral Video : 'अप्सरा आली'वर चिमुकल्याचा भन्नाट डान्स, व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Recommended image4
Mumbai Air Quality : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! हवेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा
Recommended image5
Dhirubhai Ambani International School : जगात टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय शाळा, मुंबईतील शाळेची फी किती?
Related Stories
Recommended image1
Financial Planning : महिलांनी चुकूनही घेऊ नका या ३ प्रकारचे कर्ज, वाचा कारण
Recommended image2
कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved