Mumbai Deep Cleaning Drive : मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेसाठी जुहू चौपाटीवर स्वतः चालवलं क्लिनिंग मशीन

| Published : Dec 09 2023, 07:17 PM IST / Updated: Dec 26 2023, 11:45 AM IST

CM Eknath Shinde

सार

Deep Cleaning Mumbai News : "स्वच्छतेची चळवळ ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Deep Cleaning Mumbai News : संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. “मुंबईकरांच्या आरोग्यासाठी (Public health), मुंबईच्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरू (Embellishment) असलेली स्वच्छतेची चळवळ केवळ महापालिका कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

तसेच मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी (Cleaning Staff of BMC) अहोरात्र काम करतात. त्यांच्यामुळेच मुंबई स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हीरो’ आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) हाती घेण्यात आली आहे. 3 डिसेंबर 2023 रोजी धारावी परिसरातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. 9 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेसही मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होतो.

समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेची केली पाहणी

मुख्यमंत्र्यांनी जुहू चौपाटी (Juhu Beach) येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण (CM Eknath Shinde pays tribute to Mahatma Gandhi) करून स्वच्छता मोहिमेचा आरंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्रकिनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळेस मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले की, स्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रे आणि वाहने वापरण्यात येत आहेत. त्यामुळेपरिसर कमीत कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे.

"निरोगी मुंबईकडे वाटचाल"

स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्याटप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. या मोहिमेमध्ये रस्ते, नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे विधान यावेळेस मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

आणखी वाचा

Parking Rules : मुंबईत अवैधरित्या गाडी पार्क करणाऱ्यांवर होणार कारवाई, महापालिकेचा मोठा निर्णय

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अ‍ॅलर्ट जारी

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?