सार

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी कमळ हाती घेतले आहे.

Ashok Chavan Join BJP : काँग्रेसला (Congress) रामराम ठोकल्यानंतर कालपासूनच अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच आज (13 फेब्रुवारी) अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

राजकीय आयुष्याची पुन्हा सुरुवात करणार असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करण्याआधी दिली होती. या पक्ष प्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करणार आहे. मी कोणालाही निमंत्रित केलेले नाही. याशिवाय मी कोणत्याही आमदाराला बोलावले नसल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले होते.

अमर राजूरकर यांचाही भाजपात प्रवेश
अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील पक्ष सदस्यस्त्वाचा राजीनामा दिला होता. अशातच आज अशोक चव्हाणांसह अमर राजूरकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांचे केले स्वागत
अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजपची शक्ती वाढलीय. अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे स्वागत करत आहे. आज भाजपासाठी आनंदाचा दिवस असल्याचेही देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकार परिषदेवेळी म्हटले आहे. 

भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण काय म्हणाले?
भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करत अशोक चव्हाणांनी म्हटले की, पक्ष प्रवेश हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखील काम करण्याची इच्छा असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. याशिवाय भाजपाच्या ध्येयधोरणांनुसार काम करणार असून मी पक्षाकडे कोणतीही मागणी केलेली नाही.

अशोक चव्हाण यांनी पुढे म्हटले की, वैयक्तित टीका करणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. माझ्या आधीच्या पक्षातल्या सहकाऱ्यांचे आभार. आता भाजपामध्ये प्रामाणिकपणे काम करेन. मतदारसंघांना न्याय देण्याची फडणवीसांची भूमिका असायची. भाजपच्या अधिकाधिक जागा वाढाव्या यासाठी काम करेन असेही अशोक चव्हाणांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिळण्याचा भाजपसमोर ठेवला होता प्रस्ताव
भाजपात प्रवेश करण्याआधी अशोक चव्हाण यांनी मला उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिळावा असा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला भाजपच्या मोठ्या नेत्याने विरोध केला. अशातच सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांना राज्यभा आणि एक विधानसभा देण्याचा प्रस्ताव आहे.

आणखी वाचा : 

Ashok Chavan Resigns : संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागील सांगितले कारण, पक्षाच्या नेतृत्वावर उपस्थितीत केले प्रश्न

Baba Siddique Resigns : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री बाबा सिद्दीकींनी पक्षाला ठोकला रामराम

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव