सार
Dog Attack: मुंबईत राहणाऱ्या एका 10 वर्षाच्या मुलीवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलीला तब्बल 45 टाके पडल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mumbai News: मुंबईत राहणाऱ्या एका 10 वर्षीय मुलीवर शेजारच्या घरातील पाळीव कुत्र्याने हल्ल्या केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये मुलीची प्रकृती बिघडली गेली. डॉक्टरांनी जवळजवळ दोन तास तिचे ऑपरेशन केले. कुत्रा चावल्याच्या प्रकारामुळे मुलीला 45 टाके पडले आहेत.
अंधेरीतील हे प्रकरण आहे. मुलीला जर्मन शेफर्ड (German Shepherd) कुत्रा चावल्याच्या प्रकरावरून कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीसी कलम 154 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी असा दावा केलाय की, मालकाच्या कुत्र्याने तिसऱ्यांदा एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले, ही घटना 27 नोव्हेंबर, 2023 रोजीची आहे. “माझी मुलगी इमारत क्रमांक 5 मध्ये राहणाऱ्या आपल्या फ्रेंन्डला भेटण्यासाठी जात होती. याच दरम्यान फ्रेंन्डचा कुत्रा घरातून बाहेर आला आणि त्याने मुलीवर हल्ला केला. पण फ्रेंन्डची आई हा साधारण हल्ला असल्याचे सांगत होती.”
शेजाऱ्यांनी मुलीच्या वडिलांना कुत्र्याने गंभीररित्या तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. मुलीच्या गंभीर जखमा पाहून तिला तातडीने हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जवळजवळ दोन तास तिच्यावर ऑपरेशन करत 45 टाके घातले.
कुत्र्याचा मालक देणार वैद्यकिय खर्च
कुत्र्याच्या मालकाने म्हटले, आम्ही मुलीचा संपूर्ण वैद्यकिय खर्च उचलण्यासाठी तयार आहोत. कु्त्र्याच्या मालकाला खूप वेळा सांगितले होते त्याने कुत्र्यासाठी डॉग ट्रेनर नेमावा. पण मालकाने याकडे दुर्लक्ष केले. आता तिसऱ्यांदा कुत्रा चावल्याची घटना घडल्याचे एका शेजाऱ्याने म्हटले. पीडित मुलीच्या वडिलांनी 30 नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले, तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी करून जी काही माहिती समोर येईल त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.
आणखी वाचा:
Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास
बॉलिवूडचा किंग SHAHRUKH KHANच्या जीवाला धोका, धमक्यांनंतर मिळालं Y PLUS सुरक्षाकवच