सार

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खाती वाटप करण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातील नेत्यांना पदांचे वाटप करण्यात आलं आहे. या विस्तारात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही महत्वाची खाती आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क हे खाती आली. 

  • शिवसेना पक्षाकडे कोणती खाती? -
    एकनाथ शिंदें- नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
  • उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
  • प्रताप सरनाईक – वाहतूक
  • शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
  • भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास
  • प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • दादा भुसे – शालेय शिक्षण
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  • संजय राठोड – मृदा व जलसंधारण
  • संजय शिरसाट – सामाजिक न्याय

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला काय आले?

  • उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन शुल्क
  • हसन मुश्रीफ -वैद्यकीय शिक्षण
  • अदिती तटकरे -महिला व बालकल्याण
  • धनंजय मुंडे – अन्न नागरी पुरवठा खाते
  • बाबासाहेब पाटील – सहकार
  • मकरंद पाटील – मदत व पुनर्वस खाते
  • दत्ता मामा भरणे -क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक
  • कृषी – माणिकराव कोकाटे
  • अन्न व औषध प्रशासन – नरहरी झिरवाळ