व्हॉट्सॲप ग्रुपवरून करण्यात आलेल्या ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये भावांचे २ कोटींचे नुकसान, त्या वेळी करून बसले चूक आणि...

| Published : May 28 2024, 01:01 PM IST / Updated: May 28 2024, 01:03 PM IST

online fraud

सार

पुणे येथे भावांची दोन कोटींचे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले असून याबद्दलची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही कारवाई करण्यात आली होती. 

सध्याच्या काळात ऑनलाईन फावणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पुण्यातील दोन भावांचे फसवणुकीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळ्यात पुण्यातील ५३ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या भावाची २.४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चऱ्होली बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या दोघांची फसवणूक झाल्याची घटना झाली आहे. 

पीडित महिलेने केली तक्रार दाखल - 
पीडित महिने याबाबतची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पीडित व्यक्तीला एका ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील व्हॉट्सॲप ग्रुपवर ऍड करण्यात आले होते. येथे त्याला चांगला परतावा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, असे सांगण्यात आले होते. 

हा घोटाळा कसा झाला? 
शेअर ट्रेडिंगमधून चांगला नफा मिळेल असं सांगून दोन भावांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये इन्स्टंट मेसेजिंग यावर हा घोटाळा सुरु करण्यात आला आणि यामधूनच भरीव परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. व्हॉट्सॲप ग्रुपवर यावेळी तक्रारदाराला ऍड करण्यात आले आणि त्याला चांगला नफा मिळवून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी त्याने त्याच्या भावाचा यामध्ये समावेश केला होता. 

फसवणूक झालेले दोघे भाऊ हे आयटी क्षेत्रामध्ये अभियंते असून त्यांना यामधून चांगला परतावा देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. जानेवारी महिन्यात त्यांना यामधून चांगला परतावा मिळाला आहे, असे दाखवण्यात आले होते. पुढे जाऊन मात्र त्यामधून कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. 
आणखी वाचा - 
राजीव चौक स्थानकावरील दिल्ली मेट्रोला अचानक लागली आग, प्रवाशी खरंच सुरक्षित आहेत का?
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात सापडला बॉम्ब? त्यानंतर प्रवाशांनी मारल्या खिडकीतून उड्या

Top Stories