सार
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आणि विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत उतरवण्यात आले. पण यावेळी प्रवाशांनी खिडकीतून उडी मारण्यास सुरुवात केली.
आज मंगळवारी (२८ मे) पहाटे ५ वाजता दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विमानात बॉम्ब असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले आणि एव्हिएशन सिक्युरिटी, डॉग स्क्वाड आणि बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी विमानाची तपासणी केली. यावेळी बॉम्बची बातमी समजताच प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारण्यास सुरुवात केल्याने विचित्र दृश्य पाहायला मिळाले.
विमानाच्या टॉयलेटमध्ये मिळाली चिठी -
विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्ब लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत विमानतळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रवाशांना विमानातून खाली उतरण्याची सूचना केली. यावेळी अनेक प्रवाशांना विमानाच्या इमर्जन्सी गेटमधून, अनेकांना मुख्य गेटमधून बाहेर काढण्यात आले, तर अनेकांनी घाबरून खिडकीतून उड्या मारण्यास सुरुवात केली. मात्र, सध्या सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
इंडिगो एअरलाइनने निवेदन केले जारी -
इंडिगो एअरलाइनने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक 62E2211 वर बॉम्बची धमकी मिळाली आहे. यावेळी, सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून आणि सुरक्षा राखून, विमान विमानतळाच्या मुख्य भागापासून दूर हलवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
आणखी वाचा -
राजीव चौक स्थानकावरील दिल्ली मेट्रोला अचानक लागली आग, प्रवाशी खरंच सुरक्षित आहेत का?
अनन्या पांडे हॉट, सारा अली खान हॉट, रियान पराग यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने सापडला नव्या वादात