वाल्मिक कराड सोबतचा फोटो व्हायरल; SIT मधून अधिकाऱ्याची उचलबांगडी

| Published : Jan 06 2025, 02:36 PM IST / Updated: Jan 06 2025, 08:44 PM IST

Beed Crime

सार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीमधून दोन पोलिस अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. वाल्मिक कराडसोबतच्या फोटो व्हायरल झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची(एसआयटी) स्थापना केली होती. या एसआयटीत १० सदस्यांचा समावेश करण्यात आला आणि एसआयटीमधील सर्व अधिकारी हे बीड जिल्ह्यातील आहेत. मात्र एसआयटीतील एका पोलीस अधिकाऱ्याचे वाल्मिक कराड सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आव्हाड यांच्या अक्षेपानंतर एपीआय महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

आव्हाड यांनी ट्विट मध्ये काय म्हटले

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट मध्ये म्हटले की,  यात एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ. बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहे. महेश विघ्ने आणि मनोजकुमार वाघ हे वाल्मीक कराडचे अत्यंत खास आणि जवळचे असल्याचे म्हटले आहे. असे अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. या दाव्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे पोलीस अधिकार्‍यांना अंगलट आले आहे.

आव्हाड यांच्या अक्षेपानंतर एपीआय महेश विघ्नेसह दोघांची उचलबांगडी

दरम्यान, आव्हाड यांच्या ट्वीट नंतर पोलीसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे एपीआय महेश विघ्ने यांना अंगलट आले आहे. एपीआय महेश विघ्ने यांच्यासह इतर दोघांना एसआयटीतून बाजूला करण्यात आले आहे. सध्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड सोबत एपीआय महेश विघ्ने यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आरोपीच्या जवळचा कोणीही SIT मध्ये नको अशी मागणी त्यांनी केली होती. परिणामी या मागणीची दखल घेऊन एपीआय महेश विघ्ने यांच्यासह हवलादार मनोज वाघ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-

संतोष देशमुख हत्या प्रकरणी दमानियांनी तपासावर उचलले गंभीर प्रश्न, धमकीचे आरोप!