हिंगोली लोकसभेचे हेमंत पाटलांच शिवसेना कापणार तिकीट, संतोष बांगर राहणार आगामी उमेदवार?

| Published : Apr 02 2024, 02:35 PM IST / Updated: Apr 02 2024, 02:36 PM IST

santosh bangar

सार

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून कोणाला लोकसभा उमेदवारी दिली जाणार याकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून कोणाला लोकसभा उमेदवारी दिली जाणार याकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून तिकीट जाहीर करण्यात आलं होत पण आता त्यांचे तिकीट कापले जाणार अशा चर्चा होत आहेत. त्यामुळे ते मुंबईच्या दिशेने समर्थकांना घेऊन निघालेत. 

संतोष बांगर काय म्हटले? 
यावरून आमदार संतोष बांगर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मला विचारलं, त्यावेळी मी सांगितलं की, मला लोकसभा लढवायची नाही, मी माझ्या विधानसभेत खूश आहे. जो निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, तो सर्व शिवसैनिकांना मान्य आहे. हेमंत पाटलांचे समर्थक मुंबईला जात-येत आहेत, अशी मला अजून माहिती नाही. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला, त्याचं शिवसैनिक पालन करतील."

अमित शहांनी पाळला शब्द - 
अमित शहा यांनी ही जागा शिवसेनेला सोडण्यात येईल असा शब्द दिला होता आणि त्यांनी तो शब्द पाळला आहे. मी पक्षाचे समर्थन करणारा माणूस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो पाळण्यात येईल असे संतोष बांगर यांनी म्हटले आहे. उमेदवारांमध्ये बदल करावा का नाही हे पक्षातील नेते ठरवतील असे त्यांनी म्हटले आहे. 
आणखी वाचा - 
पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर
तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट