Thane Traffic Advisory : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहान वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहेत.
Thane Traffic Advisory : ठाणे - घोडबंदर रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे मोठा वाहतूक बदल करण्यात आला आहे. नागला बंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागला बंदर ते भाईंदरपाडा या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या कामासाठी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी, ठाण्यावरून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुख्य रस्ता काही वेळेसाठी बंद करण्यात आला आहे.
कोणत्या दिवशी आणि केव्हा होणार वाहतूक बदल?
कालावधी: २२ जून ते १४ जुलै
वेळ: दररोज रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत
अधिसूचना लागू राहील काम पूर्ण होईपर्यंत
काय असतील वाहतूक मार्गात बदल?
अवजड वाहनांसाठी मार्गबदल:
ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खांब क्र. ८५ जवळून प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग : पिलर क्र. ८५ जवळून विरुद्ध दिशेने **घोडबंदर-ठाणे मुख्य मार्गावरून खांब क्र. १०२ येथून डावीकडे वळून इंडियन ऑइल पंपासमोरून पुढे गंतव्य स्थळी जावे.
हलक्या वाहनांसाठी मार्ग:
खांब क्र. ८५ जवळून सर्व्हिस रस्त्याचा वापर करून इंडियन ऑइल पंपासमोरून पुढे मुख्य रस्त्यावरून प्रवास.
गर्डर कामामुळे ठाणे दिशेने वाहने:
नागला बंदर डिपी ७२, ७३ आणि वाइन शॉपजवळून सेवा रस्त्याचा वापर करून लोढा स्प्लेन्डरा येथून मुख्य रस्त्यावर प्रवेश.
वालधुनी पुलावर अवजड वाहनांना बंदी
कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील वालधुनी पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे आता अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. २० जून रोजी एमएमआरडीए आणि महापालिकेच्या प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंना कमानी उभारल्या.यामुळे उंच वाहनांना आता प्रवेश मिळणार नाही.अशातच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- प्रवासाचे नियोजन करताना वाहतूक बदल लक्षात घ्यावा.
- अधिसूचनेनुसार रात्रीच्या वेळेस प्रवास टाळावा.
- पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी.
- या बदलांमुळे ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल आणि मेट्रो प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
घोडबंदर रोडवर 31 जणांचा अपघात
घोडबंदर रोडवर सुरू असणारी रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना वाहतूक कोडींचा मोठा सामना करावा लागतो. याशिवाय जड अवजड सामान घेऊन जाणाऱ्या कंटेनरसोबत प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागते. यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. एवढेच नव्हे जानेवारी ते मे महिन्याच्या दरम्यान या मार्गावर 31 जणांचे अपघात झाले आहेत. यापैकी सात जणांचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आलीये.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


