काळी जादू करत असल्याचा संशयामुळे 75 वर्षीय वृद्धाला जळत्या निखाऱ्यावर चालवले, पोलिसांकडून FIR दाखल

| Published : Mar 07 2024, 02:22 PM IST / Updated: Mar 07 2024, 02:27 PM IST

Thane Crime

सार

ठाणे येथील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका 75 वर्षीय वृद्धाला जळत्या निखाऱ्यावर चालवण्यात आल्याची घटना घडली आहे. खरंतर, वृद्ध व्यक्ती काळी जादू करतो असा त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता.

Thane Crime :  ठाणे येथील काही नागरिकांनी एका 75 वर्षीय वृद्धाला जळत्या निखाऱ्यावर चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरंतर, वृद्ध व्यक्ती काळी जादू करत असल्याचा नागरिकांना संशय होता. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना केरवेळे गावातील असून वृद्धाच्या शरिरावर भाजल्याचे निशाणही आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून आले की, काहीजणांनी वृद्धाला पकडले असून त्याला जळत्या निखाऱ्यांवरून चालवत आहेत. गावातील मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. यावेळीच 15-20 जण वृद्धाच्या घरात घुसले आणि त्याला घराबाहेर आणले. यानंतर वृद्धाला मंदिराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात त्याला जळत्या निखाऱ्यंवर जबरदस्ती चालण्यास सांगितले.

दरम्यान, पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले काही गावकऱ्यांना संशय होता की, वृद्ध व्यक्ती काळी जादू करतो. याच कारणास्तव वृद्धाला मारहाण देखील करण्यात आली. या प्रकरणात वृद्धाला जखमा झाल्या आहेत. आता वृद्धाच्या परिवाराने पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपींच्या भारतीय दंड संहितेचे कलम 452, 323, 324, 341, 143 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा : 

Mumbai Crime : वडाळा येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा महिन्यानंतर पोलिसांना मिळाला मृतदेह, वडिलांनी अपहरण केल्याचा लावला होता आरोप

धक्कादायक! हरियाणात अल्पवयीन मुलीचे अपहरण करत 20 दिवस केला सामूहिक बलात्कार

पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड, भावंडांची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चिखलातून बाहेर काढत ठोकल्या बेड्या