सार

हरियाणा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

Haryana Rape Case :  हरियाणात एका 15 वर्षीय मुलीचे कथित रुपात अपहरण करत सामूहिक बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जीव वाचवला असून आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी घटनेची माहिती देत म्हटले की, 20 दिवसांआधी पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याबद्दल तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. यामुळे अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आणि तपासादरम्यान तीन जणांची नावे समोर आली होती.

या प्रकरणातील तीन आरोपींपैकी दोघेजण पीडित अल्पवयीन मुलीच्या गावातीलच आहेत. तिसरा आरोपी उत्तर प्रदेशात राहणारा आहे. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. या प्रकरणात आरोपींवर POSCO कायद्यासह अपहरण आणि बलात्कारासह वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या वर्षातही अल्पवयीन मुलीवर बलात्कार
हरियाणात गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कथित रुपात अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. पीडित अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाताना तिचे आरोपींनी अपहरण केले होते. या प्रकरणात पोलिसांकडून चार पैकी तीन जणांना अटक केली होती. सर्व आरोपींचे वय 21 ते 32 वयोगटातील होते.

आणखी वाचा : 

महिलेला बेशुद्धीचे इंजेक्शन देत बलात्कार करण्यासह दाताच्या डॉक्टरने काढले अश्लील व्हिडीओ, पोलिसांकडून अटक

Crime News : तरुणीवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाच पण आरोपीचे पायही कापले गेले

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली US मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये